0
  • पुणे. ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग (79 वर्षे) यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी पुण्यात खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. उद्या 11 नोव्हेंबर रोजी त्यांच्या अत्यंसंस्कार केले जाणार आहेत. कमला, गिधाडे, सखाराम बाइंडर यांसारख्या नाटकात त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या.

    आपल्या बहारदार अभिनयाने जवळ जवळ 5 दशकांचा काळ गाजवत रंगभूमीवर आपला आगळा ठसा उमटवणाऱ्या बंडखोर अभिनेत्री ही लालन सारंग यांची खरी ओळख होती. आज सकाळी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या'कमला', 'गिधाडे', 'सखाराम बाइंडर', 'रथचक्र' यांसारख्या नाट्य परंपरांना छेद देणाऱ्या नाटकांत त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या.
    लालन सारंग यांचा जन्म 26 डिसेंबर 1941 रोजी गोव्यात झाला. लालन सारंग यांनी मुंबई मराठी साहित्य संघ, अत्रे थिएटर्सच्या नाटकांमधून अभिनय प्रवासाला सुरुवात केली. ‘मी मंत्री झालो’, ‘बुवा तेथे बाया’, ‘मोरूची मावशी’, उद्याचा संसार' आदी नाटकांचा यात समावेश होता. विजय तेंडूलकर यांच्या 'सखाराम बाइंडर' या नाटकात त्यांनी साकारलेली चंपाची भूमिका वादळी ठरली. ‘रथचक्र’, ‘कमला’, ‘गिधाडे’, ‘जंगली कबुतर’, ‘खोल खोल पाणी’, ‘घरटे आपुले छान’, ‘बेबी’, ‘सूर्यास्त’, ‘कालचक्र’ आदी नाटकातल्या भूमिका गाजल्या. ‘सामना’, ‘हा खेळ सावल्यांचा’या चित्रपटांत तसेच ‘रथचक्र’या हिंदी मालिकेतही त्यांनी काम केले. नाटकांच्या माध्यमातून साकारलेल्या भुमिकांमधून त्यांनी केवळ मनोरंजन न करता सामाजिक संदेश देण्यावर त्यांचा नेहमी कटाक्ष होता. लालन सारंग यांनी २०१२ मध्ये तब्बल एका तपानंतर जयवंत दळवी लिखित 'कालचक्र' या नाटकाच्या माध्यमातून व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन केले होते.
    ‘नाटकांमागील नाटय़’, ‘मी आणि माझ्या भूमिका’, ‘जगले जशी’, ‘बहारदार किस्से आणि चटकदार पाककृती’आदि पुस्तकेदेखील त्यांveteran actress lalan sarang passed away pune
  • नी लिहीली. कणकवली येथे झालेल्या 87 व्या मराठी नाट्यसंमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. नाट्य परिषद कोथरुड शाखेतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

Post a Comment

 
Top