0
दारव्हा : दारव्हा तालुक्यातील लोही येथे पोलिसांनी 70 हजार रुपयांच्या नकली नोटा पकडल्या. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी जगदीश खर्डेकर व स्वप्नील राठोड या दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी मंगळवारी (20 नोव्हेंबर) मध्यरात्री लोही येथे नकली नोटा छपाईच्या ठिकाणावर धाड टाकली. त्यावेळी मोठे घबाड पोलिसांच्या हाती लागले. 70 हजार रुपये किमतीच्या पाचशे, दोनशे रुपयांच्या नकली नोटा, विविध शासकीय कार्यालये, अधिकारी डॉक्टरांचे रबरी शिक्के व इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहे. चौकशीनंतर बुधवारी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक या दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

70 thousand fake notes were found in the lohi yavatmal | लोहीमध्ये 70 हजाराच्या नकली नोटा पकडल्या 

Post a comment

 
Top