0
23 नोव्हेंबरजम्मू-काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये अतिरेक्यांविरूद्ध सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या ऑपरेशन ऑल आऊट मोहिमेला मोठं यश मिळालंय. अनंतगान जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली. या चकमकीत ६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवाद्याविरोधात भारतीय सुरक्षा जवानांचं आॅपरेशन अजूनही सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यातील सेकिपोरा भागात भारतीय सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. आतापर्यंत जवानांनी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. दरम्यान, अनंतनागमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सोमवारीही जम्मू-काश्मीरमध्ये शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने चार दहशतवाद्यांना ठार मारलं होतं. 
जम्मू-काश्मीर : अनंतगानमध्ये जवानांची कारवाई, 6 दहशतवाद्यांचा खात्मा

Post a Comment

 
Top