0
Drunk Indian Woman jailed for six months in uk, after Causing Passenger Seizure Mid-Airलंडन - भारतीय वंशाच्या ब्रिटिश महिलेला येथील न्यायालयाने 6 महिन्यांचा तुरुंगवास सुनावला आहे. विमान प्रवासात दारु पिऊन गोंधळ घालणे आणि दुसऱ्या एका प्रवाशाचे जीव धोक्यात टाकण्याचे आरोप लागले होते. तेच सिद्ध झाल्यानंतर शुक्रवारी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. किरण जगदेव असे या महिलेचे नाव असून ती लायसेस्टर येथे एका कंपनीत वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत होती. सुरुवातीला तिने विमानातील स्टाफनेच आपल्याला अल्कोहोल पाजले असे आरोप लावून केस पलटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, कोर्टाने तिच्या वकिलांचा युक्तीवाद फेटाळून लावला.
नेमके काय घडले होते?- कोर्टात सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, याच वर्षी जानेवारी महिन्यात किरण (41) नावाच्या या महिलेने स्पेन ते ब्रिटन जाण्यासाठी जेट-2 एअरलाइन्सचे तिकीट बुक केले होते. तिने विमानात चढण्यापूर्वी 7 ते 8 बिअर घेतल्या होत्या. यानंतरही तिने विमानात आणखी बिअर मागितली. 
- 4 तासांच्या फ्लाइटमध्ये किरण आपल्या आसपास बसलेल्या पॅसेंजर आणि क्रूर मेंबर्सशी असभ्य वागत होती. एक वेळ अशीही आली की हवामान खराब असल्याने विमानाला झटके बसले. त्यावेळी तिने जवळपास 10 मिनिटे "आपण सगळेच मरणार" अशी ओरड सुरू केली. समोर बसलेल्या एका प्रवाशाने विरोध केला तेव्हा तिने त्याला लाथांनी मारहाण केली. 
  • - फ्लाइटमध्ये एक ऑफ ड्युटी पोलिस होता. त्याने क्रू मेंबर्सला मदत करण्यासाठी तिच्या शेजारी बसून दुसऱ्या प्रवाशाला आपली जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु, या महिलेने त्याला देखील अतिशय घाणेरड्या भाषेत शिवीगाळ सुरू केली. तिच्या वर्तनामुळे एका प्रवाशाला स्ट्रोक आला होता. या सर्वच प्रकरणांमध्ये कोर्टाने तिला दोषी ठरवून 6 महिन्यांसाठी तुरुंगात पाठवले आहे.

Post a Comment

 
Top