0
  • श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांनी शुक्रवारी 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. सिकिपोरा गावात काही दहशतवादी दबा धरून बसल्याची माहिती पोलिस आणि लष्करी दलाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे शुक्रवारी भल्या पहाटे शोध मोहिम सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यास प्रत्युत्तर देताना झालेल्या कारवाईत 6 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. परिसरात आणखी काही अतिरेकी लपल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

   मोबाईल इंटरनेट सेवा बंद
   पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांवर केलेल्या गोळीबारानंतर घटनास्थळावरून मोठा दारुगोळा जप्त केला. हे दहशतवादी काश्मिरात हल्ल्याच्या तयारीने होते असे सांगितले जात आहे. गोळीबारानंतर परिसरात तणाव वाढत असल्याने जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. सोबतच, गावात उर्वरीत दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहिम सुरूच आह श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांनी शुक्रवारी 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. सिकिपोरा गावात काही दहशतवादी दबा धरून बसल्याची माहिती पोलिस आणि लष्करी दलाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे शुक्रवारी भल्या पहाटे शोध मोहिम सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यास प्रत्युत्तर देताना झालेल्या कारवाईत 6 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. परिसरात आणखी काही अतिरेकी लपल्याची शक्यता वर्तवली जात आहे.                                                                                                                                                              


  मोबाईल इंटरनेट सेवा बंद
  पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांवर केलेल्या गोळीबारानंतर घटनास्थळावरून मोठा दारुगोळा जप्त केला. हे दहशतवादी काश्मिरात हल्ल्याच्या तयारीने होते असे सांगितले जात आहे. गोळीबारानंतर परिसरात तणाव वाढत असल्याने जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. सोबतच, गावात उर्वरीत दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहिम सुरूच आहे.

Post a Comment

 
Top