आणखी एक संशयित ताब्यात
कराड, : कराड शहरासह परिसरातून दुचाकी चोरून विक्री करणार्या दोघांना कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक करून 23 चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या होत्या. अधिक तपासात आणखी 6 दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. दुचाकी चोरी प्रकरणी आणखी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.
कराड, मलकापूर, सैदापूर परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे रविवारी रात्री सह्याद्रि रुग्णालयाजवळ शशिकांत कांबळे हा चोरटा येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे कागदपत्रांची विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली असता त्याने वेगवेगळ्या परिसरातून 17 मोटारसायकली चोरल्या असल्याची कबुली दिली. काही दुचाकी त्याने सांगली, कोल्हापूर तसेच कर्नाटक राज्यात विक्री केल्याचे सांगितले. त्याच्याकडून 15 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या होत्या. दरम्यान,
सोमवारी रात्री कृष्णा हॉस्पिटल परिसरात पोलीस पेट्रोलिंगदरम्यान ताब्यात घेतलेला संशयित अमोल कारंडे याने आणखी दोघांच्या मदतीने 12 मोटारसायकली चोरल्या असल्याची कबुली दिली. काही दुचाकी ढेबेवाडी पसिरात लावल्या असल्याचे व काही विक्री केल्याचे सांगितले होते. त्याच्याकडून 8 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या होत्या.
सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांच्या पथकाने अटक केलेल्या शशिकांत रघुनाथ कांबळे (रा. तांदुळवाडी, जि. सांगली), अमोल अधिकराव कारंडे (वय 28, रा. कुंभारगाव, ता. पाटण) या संशयितांकडून आज आणखी 6 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या तर आणखी एकास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात
आले आहे.

Post a Comment