0
 • hospital's bill can be filled up on the EMIपुणे - वाहन, घर, व्यवसाय आणि शिक्षण ईएमआयवर कर्जे मिळतात. मात्र, एखादा रुग्ण हाॅस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्यानंतर येणारे जादा रकमेचे बिल हे प्रत्येकालाच धडकी भरवणारे असते. शस्त्रक्रिया किंवा तपासणी करण्यासाठी अधिक पैशांची गरज असते. ही समस्या हेरून पुण्यातील डाॅ. साेनिया बासू अाणि त्यांचे बँकिंग क्षेत्रातील सहकारी परवेझ हुसैन यांनी शून्य ते ६ टक्के या अल्प व्याजदरात रुग्णांना १ ते ५ वर्षांपर्यंत कर्ज मिळवून देण्यासाठी 'हेल्थ फीन' या उपक्रमाद्वारे पुढाकार घेतला अाहे. त्यामुळे रुग्णांना तातडीने कर्ज मिळून त्यांना अावश्यक याेग्य उपचार घेता येतील. उपचारांचे बिल ईएमअायच्या स्वरूपात भरता येणार असल्याने रुग्णाला दिलासा मिळणार अाहे.


  हाॅस्पिटलचे बिल भरण्यासाठी रुग्णावर दागिने माेडणे, जमीन जुमला विकणे, उधारी किंवा सावकारी कर्ज घेण्याची वेळ येते. आजमितीस देशभरातील केवळ ८ ते १० टक्के नागरिकांनीच आरोग्य विमा उतरवलेला आहे. विमा पाॅलिसीचेही विशिष्ट प्रकारचे नियम असल्याने अाणि ठरावीक रकमेपुरती पाॅलिसीची तरतूद असल्यामुळे रुग्णाला अडचणी भेडसावतात. पाॅलिसीच्या ठरावीक तरतुदीपेक्षा अधिक बिल अाल्यानंतर त्यांचीही पैशांची जमवाजमव करण्यासाठी धावपळ उडते. अशा वेळी रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक यांची पैसे परतफेड करण्याची क्षमता पाहून एक तास ते अाठ तासांत कर्ज मिळवून देण्याची कल्पना डाॅ. साेनिया बासू यांना अाली.
  रुग्णांनी घेतलेल्या कर्जाच्या व्याजाचा भार हाॅस्पिटलवर 
  .
  साेनिया बासू यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले की, रुग्णालयात दाखल हाेणाऱ्या रुग्णांना हाॅस्पिटलचे बिल भरताना माेठी समस्या जाणवत अस
  पुणे, मुंंबई, नागपूरला सेवा 
  सु
  रुवातीच्या टप्प्यात पुणे, मुंबर्इ, नागपूर, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू येथील १०० रुग्णालयांत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात अाली अाहे. रुग्णांना कमीत कमी दहा हजारांपासून कर्ज तत्काळ उपलब्ध हाेऊ शकते. त्यासाठी रुग्ण दाखल असण्याची अावश्यकता नसून रुग्णालयातील विविध चाचण्यांसाठीही त्याला कर्ज उपलब्ध हाेर्इल, असेही त्या म्हणाल्या. अधिक माहितीसाठी ७०३०७६०७६० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.डाॅ
 • ल्याचे लक्षात अाले. त्यानुसार अल्प व्याजदरात त्यांना विविध अाजारांवर उपचार घेण्यासाठी कशा प्रकारे कर्ज उपलब्ध करून देता येईल यावर बँकिंग क्षेत्राचा अनुभव असलेले सहकारी परवेझ हुसैन यांच्याशी चर्चा केली. विविध स्टार्टअप बँकांशी समन्वय साधण्यात अाला. त्यानुसार काही बँका व वित्तीय संस्थांच्या माध्यमातून शून्य ते ६ टक्के दराने रुग्णांना एक वर्षापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. कर्जावरील व्याजाचा भार हा संबंधित रुग्णालय उचलत अाहे, हाही एक दिलासा आहे.

Post a Comment

 
Top