0
 चालकाचा ताबा सुटल्याने आज पहाटे 5 वाजता मुंब्रा बायपास रोडवरील घाटात दोन कंटेनर आदळून घरावर कोसळल्याची घटना घडली. यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले असून घरातील तिघे जखमी झाले आहेत.
दिनेश आवटे (वय 3) याच्या हाताला तर घरमालक बाबू आवटे यांच्या पत्नी भाग्यश्री यांच्या पायाला किंचित दुखापत झाली आहे. कंटेनर चालक अब्दुल मना याला गंभीर दुखापत झाली असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना मुंब्रा देवी मंदिराच्या समोरील हनुमान मंदिराजवळ घडली आहे. घटनास्थळी वाहतूक कोंडी झाली असून दुसऱया बाजुने एकेरी वाहतुकही सोडण्यात आली आहे. पोलीस, पालिकेचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून दोन्ही कंटेनर काढण्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

Post a Comment

 
Top