0
 • Dogs, elephants, who came from the plane to kill avni, had comeयवतमाळ - महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यात ठार करण्यात आलेल्या अवनी वाघिणीच्या मृत्यूवरील चर्चा अजूनही थांबलेली नाही. अवनीला ठार मारण्याचे नियोजन कसे झाले त्याची ही माहिती.

  - सर्वोच्च न्यायालयाने अवनीला मारण्यासाठी ११ सप्टेंबरला मंजुरी दिली होती. दुसऱ्या दिवशीपासून मोहीम सुरू झाली. तिने १३ माणसांची शिकार केली होती, असे सांगितले जाते. या मोहिमेत वन विभागाचे सुमारे २०० अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश होता.
  -विभागाने राळेगाव तहसीलच्या लोणी गावातील जंगलात बेस कॅम्प बनवला. कर्मचाऱ्यांनी ६५० हेक्टर जंगलात तिचा शोध सुरू केला. शिकारी नवाब अलीच्या चमूला बोलावण्यात आले.
  - वाघीण मिळाली नाही तेव्हा नवाबचा दिल्लीचा मित्र आणि गोल्फर ज्योती रंधावाच्या इटालियन कुत्र्यांना बोलावण्यात आले. रंधावा आपल्या केन कार्स प्रजातीच्या कुत्र्यांना घेऊन विमानाने नागपूरला आले होते. तेथून ते कारने बेस कॅम्पला आले. पण रंधावा यांच्यावर सोशल मीडियात हल्ले वाढल्यानंतर ते लगेच कुत्र्यांसह परत गेले.
  - अवनीला शोधण्यासाठी कमरेपर्यंतचे गवत अडचणीचे ठरले. शोध सोपा व्हावा म्हणून मध्य प्रदेशातून ४ हत्ती मागवण्यात आले. हे चारही हत्ती भाऊ होते. पाचवा हत्ती ताडोबा येथून मागवण्यात आला. एक दिवस अचानक ताडोबाहून आणलेल्या हत्तीने गावाकडे धाव घेतली. त्याने एका महिलेला ठार मारले. एका ज्येष्ठ नागरिकाला जखमी केले. त्यानंतर सर्व हत्तींना परत पाठवण्यात आले.
  - अवनीला आकर्षित करण्यासाठी जंगलात ठिकठिकाणी बकऱ्या-घोड्यांना बांधून मचाण तयार करण्यात आले. जंगलात १०० पेक्षा जास्त कॅमेरे लावण्यात आले. ५२ जागी प्रेशर इम्प्रेशन पॅड (पीआयपी) तयार करण्यात आले. तेथे रोज पहाटे तपासणी होत होती.
  - विभागाने अवनीच्या शोधासाठी दिल्लीहून पॅरा मोटार मागवली. पण २-३ उड्डाणे घेतल्यानंतर मोटार बंद झाली. नंतर ड्रोनने शोध सुरू झाला. मग दुसऱ्या वाघिणीचे मूत्र शिंपडून तिला आकर्षित केले. २ नोव्हेंबरला मोहिमेचा ५२ वा दिवस होता. अवनी मूत्राकडे आकर्षित झाली आणि बाहेर पडली. तेव्हा असगर अलीने अवनीवर गोळ्या झाडल्या.
  असा मिळाला होता आदेश
  - यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, पांढरकवडा आणि कळंब तहसीलच्या २५ पेक्षा जास्त गावांत अवनीची दहशत होती. अवनीने जेव्हा ८ वी शिकार केली तेव्हा लोकांनी गावात आलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे वाहन जाळले होते. त्यानंतर विभागाने वाघिणीला पकडण्याचा आदेश काढला. त्याच दरम्यान अवनीने २ पिलांना जन्म दिला. नंतर अवनीने २८ ऑगस्ट २०१८ ला १३ व्या व्यक्तीची शिकार केली. वन विभागाने तिला मारण्याचा निर्णय घेतला. वन्य प्राणी प्रेमी उच्च न्यायालयात गेले, पण न्यायालयाने विभागाला अवनीला मारण्याची परवानगी दिली. त्याचबरोबर वाघिणीला बेशुद्ध करून जिवंत पकडण्याचा प्रयत्न करावा, असेही सांगितले. नंतर सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.

Post a Comment

 
Top