0

 देशातील 50 टक्के ATM बंद पडणार?

देशातील 50 टक्के ATM पुढील चार महिन्यात म्हणजेच मार्च 2019 पर्यंत बंद पडणार आहेत, अशी शक्यता देशभरातील ATM ऑपरेटर्सची संस्था असलेल्या Confederation of ATM Industry (CATMi)ने एका निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.
Moneycontrol या वेबसाईटनं दिलेल्या बातमीनुसार, देशात सध्या अंदाजे 2 लाख 38 हजार ATM आहेत. त्यापैकी 1 लाख 13 हजार ATM बंद होण्याची शक्यता आहे.
यातील 1 लाख ATM हे बँकांच्या शाखांशी थेट संलग्न नसणारे म्हणजे ऑफ-साईट आहेत तर 15 हजार व्हाईट-लेबल प्रकारातील ATM असल्याचे CATMiच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.
"याचा सर्वाधिक फटका प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सवलतींचे पैसे ATM मधून काढणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला बसेल. तर शहरी भागांमध्येही नोटाबंदीनंतरसारख्याच रांगा ATM बाहेर लागण्याचे चित्र दिसेल," अशी भीती CATMiच्या प्रवक्त्यांनी एका निवेदनात व्यक्त केली आहे.
नोटाबंदीच्या वेळी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आली होती. त्यामुळे ATMबाहेर मोठ्या रांगा होत्या.

Post a comment

 
Top