0
  • Sri Lanka President dissolves parliament fresh polls to be held on Fifth Januaryश्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी संसद बरखास्त करण्याचे आदेश काढले आहेत. यासोबतच 5 जानेवारी रोजी संसदीय निवडणुकींची घोषणा त्यांनी केली आहे. पंतप्रधान महिंदा राजपाक्षे यांच्याकडे संसदेत बहुमत नव्हते हे यावरून स्पष्ट झाले आहे. 26 ऑक्टोबरपासून श्रीलंकेच्या राजकारणात नाटकीय घटनाक्रमाला सुरुवात झाली. राष्ट्राध्यक्ष सिरीसेना यांनी पंतप्रधान रानिल विक्रमेसिंघे यांना पदावरून काढून त्यांच्या जागी माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांना पंतप्रधान केले. तेव्हापासूनच श्रीलंकेत राजकीय वातावरण चिघळले होते.
    असे आहे निवडणुकीचे नियोजन
    सिरीसेना यांनी संसद बरखास्त करण्यासाठी काढलेल्या आदेशावर शुक्रवारी मध्यरात्री स्वाक्षरी केली. त्यानुसार, 19 ते 26 नोव्हेंबर दरम्यान निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 5 जानेवारी रोजी निवडणुकीसाठी मतदान होईल. आणि 17 जानेवारी पर्यंत नवीन संसदेची स्थापना केली जाणार आहे. राजपाक्षे यांना पंतप्रधान केल्यानंतरही बहुमत मिळवणे शक्य नव्हते. त्यामुळे, कार्यकाळ संपुष्टात येण्याच्या 21 महिन्यांपूर्वीच राष्ट्राध्यक्षांनी निवडणुकीची घोषणा केली. अन्यथा ऑगस्ट 2020 पर्यंत सरकारचा कार्यकाळ संपला नसता.
    विरोधक म्हणाले, घोषणा घटनाबाह्य
    तर दुसरीकडे, एक्सपर्ट्स आणि विरोधकांनी राष्ट्राध्यक्षांच्या आदेशांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 19 व्या घटनादुरुस्तीनुसार, संसदेचा कार्यकाळ 4.5 वर्षांचा असावा अशी तरतूद आहे. त्यामुळे संसद बरखास्त करण्याचा त्यांचा हा निर्णय घटनाबाह्य असल्याचा दावा त्यांनी केला. विक्रमेसिंघे यांचा पक्ष युनायटेड नॅशनल पार्टी (यूएनपी) ने हा निर्णय मान्य नाही असे स्पष्ट केले. एवढेच नव्हे, तर राष्ट्राध्यक्षांनी सामान्य नागरिकांच्याही अधिकारांवर गदा आणली असा आरोप त्यांनी केला आहे.

Post a Comment

 
Top