0
उस्मानाबाद - कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या राष्ट्रीयीकृत बँकांतील ४८ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ २६३७ शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज दिल्याची नोंद सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्जमाफीची प्रक्रिया करण्यास व नवीन कर्ज वाटपाला विलंब होत असल्यामुळे त्यांच्याकडून जिल्हा उपनिबंधकांकडे माहितीही दिली नाही. जिल्हा बँकेने ३७ हजार ९०७ शेतकऱ्यांना कर्ज वाटप केल्याचे दाखवले आहे. यामुळे जिल्ह्याचा आकडा फुगून ४० हजार ७४४ वर गेला आहे.
 • शासनाने कर्जमाफी योजना जाहीर केल्यापासून याच्या अंमलबजावणी होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी अनेक अडथळे सुरू आहेत. यामुळे शेतकऱ्यांना म्हणावे तसे समाधान कर्जमाफीमुळे मिळालेले नाही. अनेक अडचणी, क्लिष्ट प्रक्रिया, राष्ट्रीयीकृत बँकांकडून प्रक्रियेला होणारा विलंब यामुळे कर्जमाफीच जाचक वाटत असल्याचे वातावरण जिल्ह्यात निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबादमध्ये आल्यानंतर आता व पूर्वीही कर्जमाफी झाल्यावर लगेच नवीन कर्ज वितरण करण्याची घोषणा केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला छेद देण्याचे काम बँकांकडून होत आहे.

  जिल्हा बँकेने १३ व्या तर राष्ट्रीयीकृत बँकांनी नवव्या ग्रीनलिस्टपर्यंत कर्जमाफी दिली आहे. यामध्ये ९९ हजार २० शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याची नोंद आहे. यामध्ये सुमारे ४८ हजार शेतकरी जिल्हा बँक वगळता अन्य राष्ट्रीयीकृत बँकांचे आहेत. यातील केवळ २६३७ शेतकऱ्यांना नवीन कर्ज वाटप करण्यात आले आहे. ही आकडेवारीही नवव्या ग्रीनलिस्टपर्यंतची आहे. यानंतर आलेल्या १३ ग्रीनलिस्टपर्यंतची राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज वितरणाची प्रक्रियाच केलेली नाही. यामुळे याची माहितीही जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठवण्यात आलेली नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३७ हजार ९०७ शेतकऱ्यांना कर्ज वितरण झाल्याचे दाखवले आहे.

  मात्र, यामध्ये प्रोत्साहनपर लाभ ३७ हजार ७९८ शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. जिल्हा बँकेने केवळ आकडेवारीचा मेळ घालून कर्ज वितरणाचा आकडा फुगवला आहे. जिल्हा बँकेची परिस्थिती सध्याही बिकट आहे. यामुळे बॅक प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात मोठ्या कर्जाची रक्कम देऊ शकत नाही.

  यामुळे खऱ्या अर्थाने राष्ट्रीयीकृत बँकांच कर्ज वितरण करत आहेत. त्यांच्याकडून केवळ २६३७ लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे.
  कर्जवाटपच नसल्यामुळे बँकांची माहिती देण्यास टाळाटाळ
  वितरण वाढवण्याची गरज
  सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधाराची गरज आहे. अशा परिस्थितीतीत कृषी कर्ज, पीक विमा वितरण, अनुदान हाच एकमेव पर्याय आहे. यामध्ये कृषी कर्जावर अधिक भिस्त आहे. यामुळे तातडीने वितरणाचा जोर वाढवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. अन्यथा उस्मानाबादची पुन्हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळख कायम राहण्याचा धोका आहे.
  सर्च रिपोर्टचा भुर्दंड
  शेतकऱ्यांना नवीन कर्जवितरणासाठी पुन्हा जमिनीचे मॉर्टगेज करण्यास सांगण्यात येत आहे. यासाठी काही बँका शेतकऱ्यांचा सर्च रिपोर्ट घेण्यास सांगत आहेत. अगोदरच बोजा असेल तर मॉर्टगेज करताच येत नाही. तेव्हा सर्च रिपोर्ट कशासाठी हा प्रश्न आहे. त्यात पुन्हा एका विशिष्ठ विधिज्ञांकडे सर्च रिपोर्टसाठी पाठवण्यात येते. तो विधिज्ञ शेतकऱ्यांना न परवडेल इतके शुल्क आकारतो. एका प्रकारे शेतकऱ्यांची लुटच आहे.
  प्रशासनाचाच कोलदांडा
  प्रशासनाकडून सातत्याने कर्जमाफी व वितरणाचा आढावा घेतला असल्याचे सांगण्यात येते. बँका काय माहिती देतात याची खात्रीच कोणतीही यंत्रणा करत नाही. अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तर केवळ बसूनच असतात. यामुळे जिल्ह्यातील बँकांवर नियंत्रण कोण ठेवणार हा प्रश्न आहे.
  सर्च रिपोर्टचा भुर्दंड
  शेतकऱ्यांना नवीन कर्जवितरणासाठी पुन्हा जमिनीचे मॉर्टगेज करण्यास सांगण्यात येत आहे. यासाठी काही बँका शेतकऱ्यांचा सर्च रिपोर्ट घेण्यास सांगत आहेत. अगोदरच बोजा असेल तर मॉर्टगेज करताच येत नाही. तेव्हा सर्च रिपोर्ट कशासाठी हा प्रश्न आहे. त्यात पुन्हा एका विशिष्ठ विधिज्ञांकडे सर्च रिपोर्टसाठी पाठवण्यात येते. तो विधिज्ञ शेतकऱ्यांना न परवडेल इतके शुल्क आकारतो. एका प्रकारे शेतकऱ्यांची लुटच आहे.
  केवळ २७ कोटींचे वितरण
  राष्ट्रीयीकृत बँकांनी केवळ २७ कोटी रुपयांचे नवीन कर्ज वितरित केल्याची नोंद आहे. एकूण कर्ज वितरण १५२ कोटी रुपये आहे. त्यामध्ये एकट्या जिल्हा बँकेने १२५ कोटी कर्ज वितरित केले असल्याचे सांगितले आहे. यामुळे जिल्ह्याचा कर्ज वितरणातील आकडा वाढला असल्याचे नमूद आहे.
  जिल्ह्यात अशी स्थिती
  -२६३७ शेततकऱ्यांना रा. बँकेतून कर्ज
  -३७९०७ जिल्हा म. बँकेकडून कर्ज
  -१२५ कोटी जिल्हा बँकेतून वाटप
  -२७ कोटी रा. बँकेकडून वितरित रक्कमLoan again to 2637 farmers, out of 48 thousand loaned

Post a comment

 
Top