नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या मुस्लिम धर्मगुरूंच्या शिष्टमंडळातील एकाला अटक करण्यात आली आहे. दिल्लीत सोमवारी जनता दरबार भरला होता आणि मुख्यमंत्री आपल्या राज्यातील विविध समुदाय आणि संस्थांसह लोकांच्या समस्य ऐकूण घेत होते. यावेळी मुस्लिम धर्मगुरूंचे एक शिष्टमंडळ वक्फ बोर्डाकडून दिल्या जाणाऱ्या मानधनात वाढ करण्याची मागणी घेऊन आले होते. मोहम्मद इमरान (39) असे या मौलानाचे नाव असून त्याच्या बॅगेत जिवंत काडतूस सापडले. त्यामुळेच, त्याला अटक करून सध्या कसून चौकशी केली जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, अरविंद केजरीवाल यांच्या मिरचीपूड हल्ला करण्याचे प्रकरण सध्या चर्चेत असतानाच ही नवीन घटना घडली आहे. त्यामुळे, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment