0
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाळवा तालुक्यातील पेठ नाका येथे भिवंडीहून कोल्हापूरला मालाची वाहतूक करणाऱया टॅम्पोला शॉट सर्किटने आग लागून  टेम्पोसह टेम्पोत असणाऱया मालाचे सुमारे 38 लाखाचे नुकसान झाले. आग लागल्याचे समजताच चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून उडी मारली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याबाबत शहाजी नवनाथ खरात (वय 25 रा. जांभळवाडी ता. कवठेमहंकाळ) यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
  शहाजी खरात हे टाटा 1109 एल.सी.व्ही. क्र.एम.एच.50. 482 टेम्पोमध्ये भिवंडी येथील कंपनी महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट यांचा माल भरून कोल्हापूर येथील गांधीनगर येथे पोच करण्यासाठी निघाले होते. दरम्यान, तीन नोव्हेंबर रोजी ते पेठनाका येथे सकाळी आठ सुमारास आल्यानंतर गाडीमध्ये वायरिंग शॉर्टसर्किट झाल्याने गाडीने पेट घेतला. त्यात सात लाख रूपये किंमतीची गाडी जळून खाक झाली. तसेच गाडीत असणारा क्रॉम्टन ग्रीव्हज् लिमेटेड, हाबेलस इंडिया, पवन मार्केटींग, गंगा टेडर्स, एल.एन.एन्टरप्रायजेस या कंपन्यांचा सुमारे 31 लाखांचा माल जळून खाक झाला आहे. याबाबत चालक शहाजी खरात यांनी इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले. इस्लामपूर नगरपालिकेच्या अग्निश्नशामक दलाच्या गाडय़ांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वी टेम्पो साहित्यांसह जळून खाक झाला होता.

Post a Comment

 
Top