0
औरंगाबाद- काका अाणि भावाचा कुस्तीमधील दबदबा रूपालीच्या मनावर चांगलाच बिंबला अाणि तिने यात करिअर करण्याचा ध्यास घेतला. वडिलांनीही तिच्या याच अात्मविश्वासाला मदतीचे पाठबळ दिले. यासाठी शेताच्या बांधावरच कुस्तीसाठी खास मातीचा अाखाडा तयार केला. याच ठिकाणी मातीत तिने कुस्तीचे तंत्रशुद्धपणे कुस्तीचे धडे गिरवले. यातून तिच्या प्रतिभेला चालना मिळाली. यासाठी घेतलेल्या मेहनतीचा प्रत्ययही १९ वर्षीय रूपाली वर्देने अखिल भारतीय अांतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत आणून दिला.

तिने ५३ किलाे वजन गटाच्या लढतीत अवघ्या ३५ संेकदांत प्रतिस्पर्धी कुस्तीपटूला चितपट केले. यासह तिने सर्वांचे लक्ष वेधले. कुस्तीपाठाेपाठच प्रतिभावंत ज्युदाेपटू म्हणूनही रुपालीचा नावलाैकिक अाहे. तिने गत महिन्यात राज्यस्तरीय ज्युदाे स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. अाता या स्पर्धेत खेळत अाहे. तिने अापल्या वजन गटाच्या दुसऱ्याच लढतीत काेट्याम विद्यापीठाच्या पायाल कानुरेला चीतपट केले हाेते. यासह तिला तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला हाेता. मात्र, याच ठिकाणी तिला विजयाची अापली लय कायम ठेवता अाली नाही. तिसऱ्या फेरीमध्ये तिने विजयासाठी श‌र्थीची झंुज दिली. मात्र, तिचा प्रयत्न अपयशी ठरला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेत ६२ किलो वजन गटात एमडी विद्यापीठ, रोहतकच्या अन्शू धरमवीर, एस. विद्यापीठ, ७२ किलो वजन गटात राजस्थानच्या नैना आणि ५३ किलो वजन गटात गुरू जनेश्वर सायन्स टेक्नॉलॉजीच्या अंकुशने सुवर्ण जिंकत दुसरा दिवस गाजवला. 
विद्यापीठ परिसरातील साई प्रशिक्षण केंद्रात सुरू असलेल्या स्पर्धेत ७२ किलाे वजन गटात पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मनीषा दिवेकरने ७२ किलो वजन गटात रौप्यपदक जिंकले.

मनीषा फायनलमध्ये नैनाने चितपट करत सोने जिंकले. गटात भिवानी विद्यापीठाच्या प्रीती रवींद्रके आणि पंजाब विद्यापीठाच्या रमणदीप कौरने शानदार प्रदर्शन करत कांस्यपदक मिळवले. विजेत्या खेळाडूंना कुलसचिव डॉ. साधना पांडे, साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. याप्रसंगी निरीक्षक राजेंद्र खत्री, डॉ. मधू भांडारकर यांची उपस्थिती होती. स्पर्धेत पंच म्हणून प्रा. दिलीप पवार, स्पर्धा प्रमुख डॉ. हंसराज डोंगरे, शरद कचरे, रणवीरसिंग रहाल, डॉ. भुजबळ, हरीदास म्हस्के, डॉ. श्याम काबलिये, डॉ. शेखर शिरसाठ, गणेश जाधव, साेमीनाथ बखरे, मंगेश डोंगरे, मुक्तार पटेल, शेख अजिज, चंद्रवीर आदी काम पाहत आहेत.
डाेंगरमाथ्यावर नियमित सराव
अापल्या फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी जिम लावणे अार्थिक अडचणीमुळे अशक्य अाहे. मात्र, असे असतानाही रूपालीने कधीही हार मानली नाही. अापल्या घराच्या अासपास असलेल्या डाेंगरमाथ्यावर ती धावण्याचा सराव करते. डाेंगरमाथे चढून अाणि उतरून तिने अापला फिटनेस कायम ठेवला.
वडिलांना मदतीचा हात देत जपला कुस्तीचा छंद; अाज पदकाचा विश्वास
वैजापूर तालुक्यातील बाभूळगावातील छाया पवार. घरातील हलाखीच्या परिस्थितीतही माेठ्या धाडसाने स्वत:च्या पायावर उभी राहिली. शिक्षणाशिवाय अापल्यातील प्रतिभा तिने जपली अाणि कुस्तीच्या मॅटवर अाज अव्वल खेळाडू म्हणून छाप पाडली. अाैरंगाबाद संघासाठी पदकाचे अाशा स्थान म्हणून छायाकडे पाहिले जाते. अाज साेमवारी ती ५७ वजन गटात अापला कस लावणार अाहे. गवंडीकाम करणाऱ्या वडिल हिरामण पावर यांना हातभार लावण्यासाठी छायाची सातत्याने धडपड असते. अशा कामात मदत करताना तिने कुस्तीचाही छंद यशस्वीपणे जाेपासला.Wrestling lessons in the field; Bronze in Judah last month

Post a Comment

 
Top