0
उपाध्यक्षपदावर शिवसेनेने दावा केला होता, परंतु भाजपने हे पद रिक्त ठेवले होते                                                                          मुंबई- अखेर विधानसभेला उपाध्यक्ष मिळणार आहे. 4 वर्षांपासून रिक्त असलेल्या या पदासाठी 30 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष पद शिवसेनेकडे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा उपाध्यक्ष पद मागील 4 वर्षांपासून रिक्त आहे. उपाध्यक्षपदावर शिवसेनेने दावा केला होता, परंतु भाजपने हे पद रिक्त ठेवले होते. आगामी लोकसभा निवडणुका आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हे पद भरले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात मराठा आरक्षणासंदर्भात बैठक पार पडली.
Post of deputy Speaker of the State Assembly will goes to Shivsena

Post a Comment

 
Top