0
नवी दिल्ली- गेल्या सात आठवड्यांत अांतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल ३० टक्के स्वस्त झाले. दुसरीकडे गेल्या दीड महिन्यात रुपया ५ टक्के वधारला. मात्र, सरकारी तेल कंपन्यांनी याचा प्रत्यक्ष लाभ ग्राहकांना अत्यंत कमी प्रमाणात दिला. या काळात कंपन्यांनी पेट्रोलचा दर फक्त ११.८%, तर डिझेलचा दर ८.७ % कमी केला. कंपन्यांच्या नफ्यात मात्र पेट्रोलवर ७२३ % आणि डिझेलवर २३१ % वाढ झाली.

तेल रिफायनरी कंपन्या कच्च्या तेलाच्या किमतीवर १५ दिवसांची सरासरी ग्राह्य धरून 
त्याच्या वाहतुकीवर होणारा खर्च आणि रुपयाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्य या आधारे इंधन निर्मितीचा खर्च ठरवतात. याला कन्व्हर्जन कॉस्ट म्हटले जाते. ही कॉस्ट १५ ऑक्टोबरला सर्वाधिक होती. त्यानंतर पेट्रोलची कन्व्हर्जन कॉस्ट २७ % तर डिझेलची १८ % कमी झाली.इराणवर निर्बंध असतानाही अमेरिकेने भारतासह काही देशांना इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्याची सूट दिली. यामुळे जागतिक बाजारपेठेत मागणीपेक्षा अधिक पुरवठा होत असल्याने क्रूड तेलाचे भाव कमी झाले.

४ ऑक्टोबरला विक्रमी दरवाढ : पेट्रोल आणि डिझेलचे दर ४ ऑक्टोबरला विक्रमी होते. या दिवशी दिल्लीत पेट्रोल ८४ रुपये लिटर तर डिझेल ७५.४५ रुपये होते. आता पेट्रोल ७४.०७ रुपये आणि डिझेल ६८.८९ रुपये आहे. म्हणजेच पेट्रोल ११.८ टक्के तर डिझेल ८.७ टक्के स्वस्त झाले आहे.
ब्रेंट क्रूड ऑइल ८६ डाॅलरवरून आले ६० डॉलरवर
३ ऑक्टोबरला जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड ८६ डॉलर प्रति बॅरलहून अधिक होते. आता ते ६० डॉलरच्या जवळपास आहे. ९ ऑक्टोबरला डॉलर ७४.३९ रुपये होता, आता तो ७०.७९ रुपये आहे. म्हणजे रुपयाचे मूल्य ५ टक्के वाढले. यामुळे आयातीसाठी लागणारा खर्च कमी होणार आहे.
In seven weeks, crude was 30% cheaper, petrol rates dropped by 11.8%

Post a Comment

 
Top