0
नागपूर- मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन शिक्षकांना भरधाव गाडीने उडवले. यात दोघांचा जागेवरच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे बुधवारी ही घटना घडली. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

नागोराव गुंडेराव बनसिंगे (वय 41) व हेमंत भाऊराव लाडे (वय-52) हे दोन शिक्षक दुर्गेश्वर चौधरी या आपल्या मित्रासह बुधवारी सकाळी फिरायला निघाले होते. त्यावेळी एम. एच. ३१, ईएन ९८७ या बोलेरो गाडीने छिंदवाड्याहून माळेगावला जात असताना जनता लॉनसमोर तिघांनाही मागून धडक दिली. यात दोघे शिक्षक जागीच ठार झाले. तर दुर्गेश्वर चौधरी जखमी झाले. गाडीचा चालक दिलीप परशराम वाघाड याला अटक करण्यात आली अाहे.
जखमी चौधरी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतक आणि जखमी हे सर्व व्यवसायाने शिक्षक आहेत. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त हे 3 मित्र एकत्र आले होते. सलग सुट्ट्या आल्याने मित्रांनी काही बेत आखले होते. एरवी कामात व्यस्त असल्याने एकमेकांची भेट होत नसल्याने त्यांनी एकत्र येत सकाळी साडे पाचच्या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी जाण्याचे ठरवले. नागोराव बानसिंगे, हेमंत लाडे आणि दुर्गेश्वर चौधरी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी छिंदवाडा मार्गावर फिरत असताना मागून आलेल्या बोलेरो गाडीने तिघांनाही धडक दिली. घटनास्थळावरून काही अंतरावरच पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेली गाडी जप्त केली आहे.

दिवाळीच्या दिवशी ही घटना घडल्याने सावनेर परिसरात शोककळा पसरली आहे.

  • Two Died in Savner area Nagpur the three people dashed by car

Post a Comment

 
Top