इस्लामाबाद - पाकिस्तानच्या कराची येथे चिनी दुतावासाजवळ मोठा बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता हा बॉम्बहल्ला घडविण्यात आला. विशेष म्हणजे या धमाक्यानंतर गोळीबारही सुरू करण्यात आला. या घटनेत आत्तापर्यंत दोन सुरक्षा जवानां मृत्यू झाल्याची माहिती आहे.
पाकिस्तानमधील या परिसराला रेड झोन असे संबोधण्यात येते. जगातील अनेक देशांचे कार्यालय याठिकाणी आहेत. त्यामुळे येथे अधिकतम सुरक्षा व्यवस्था असते. तरीही, 3 ते 4 हल्लेखोरांनी चीना दुतावासाच्या कार्यालयात घुसकोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर फायरींग करत त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा हल्ला घडविण्यात आला आहे. दरम्यान, हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याबाबत अद्याप माहिती नाही. पण, पाकिस्तानमधील सुरक्षा रक्षकांना घटनास्थळाला घेराव घातला असून पोलीसही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे
त.

Post a Comment