0

कोयना धरण परिसरात 2.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. त्याचा केंद्रबिंदू 28.8 किलोमीटर अंतरावर वारणा खोर्‍यात जावळे गावच्या दक्षिणेला 5 किलोमीटर अंतरावर होता. त्याची खोली 18 किलोमीटर असल्याचे भूकंपमापन केंद्रावरून सांगण्यात आले. 
हा भूकंप पाटण, पोफळी, अलोरे, कोयना आदींसह वारणा व चिपळूण तालुक्यातील काही विभागात जाणवला. यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसून कोयना धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा शासकीय सूत्रांनी दिला.
Image result for KOYANA DAM

Post a Comment

 
Top