मुंबई - मुंबई शेअर बाजारात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी पारंपरिक विशेष सत्रात झालेल्या प्रचंड खरेदीमुळे शेअर बाजाराचा निर्देशांक २४५.७७ अंकांनी उसळून ३५,२३७.६८ वर बंद झाला. या माध्यमातून मुहूर्ताची दमदार खरेदी होत संवत २०७५ चा प्रारंभ झाला. दीपावलीच्या दिवशी सायंकाळी मुंबई शेअर बाजारात एक तासाचे विशेष सत्र असते. या पारंपरिक सत्रात मुहूर्ताच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या पडतात. बुधवारीही सत्राच्या प्रारंभी सेन्सेक्स ३५,३१० अंकांवर उघडला. यानंतर गुंतवणूकदारांनी सर्वच क्षेत्रांत खरेदी केल्याने निर्देशांक वधारला. तर, दिल्ली शेअर बाजारात निफ्टीनेही १०,६०० अंकांची पातळी गाठली.
हे शेअर मजबूत
बुधवारी शेअर निर्देशांकात बहुतांश शेअर्स हिरव्या संकेतासह व्यवहारात होते. यात महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, वेदांत आणि हीरो मोटोकॉर्प या शेअर्सची अधिक चलती होती.
विशेष खिडकी
दिवाळीच्या दिवशी मुहूर्ताच्या खरेदीसाठी खास खिडकी उघडली जाते. सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या काळात एक तास व्यवहार होतात.गेल्या वर्षीपेक्षा ६ टक्के मजबूत- यंदाच्या संवताचा प्रारंभ गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक मजबूत झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा सेन्सेक्स ६ टक्के अधिक मजबूत झाला. मात्र, इंग्रजी कॅलेंडरच्या हिशेबाने पाहता हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी फारसे समाधानकारक राहिलेले नाही.
- इंग्रजी कॅलेंडरनुसार आतापर्यंत सेन्सेक्सने ६ टक्के घसरण नोंदवली आहे. मंगळवारी पण सेन्सेक्स किंचित घसरणीसह ३५ हजारांच्या खाली बंद झाला होता. तर निफ्टी ६ अंकांच्या किरकोळ तेजीसह १०,५३० वर बंद झाला होता.कमावण्याची सुवर्णसंधी : मुहूर्तावर शेअर बाजारात गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. विशेषत: ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी पैसा आहे ते लोक छोट्या गुंतवणुकीतून अधिक कमावतात. म्हणूनच मुहूर्ताच्या ट्रेडिंगला महत्त्व आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment