0
  • BJP - Two MIM factions have been injured, 27 activists injuredहिंगोली - शहरातील गारमाळ येथे १२३ रेशनकार्ड धारक बोगस असल्याची तक्रार देण्यात आल्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीपासून भाजप आणि एमआयएम या दोन राजकीय पक्षांमध्ये चालू असलेल्या वादात शनिवारी दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटांतील सुमारे २७ कार्यकर्ते जखमी झाले असून त्यातील ७ जणांना प्रकृती गंभीर झाल्याने नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले.


    हिंगोली शहराजवळ असलेल्या गारमाळ वॉर्डातील रास्त भाव दुकानाची बोगस लाभार्थी असल्याच्या कारणावरून चौकशी करण्याची मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली होती. या दुकानाचा परवाना निलंबित झाला असल्याने या दुकानाचे लाभार्थी हिंगोली शहरातील रिसाला बाजार येथील एस.एम. भट्ट या रास्त भाव दुकानाशी जोडले आहेत. पुन्हा आता गारमाळ येथे नवीन दुकान मंजूर झाल्याने आणि जुन्या दुकानातील १२३ लाभार्थी बोगस असल्याची तक्रार झाल्याने येथील तहसील विभागातील पुरवठा विभागाचे शेख अलबक्ष व इतर कर्मचारी पंचनामा करण्यासाठी गेले होते. या वेळी अल्लाबक्ष यांना एका गटाने मारण्यास सुरुवात केली.
    त्यामुळे या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. त्यानंतर खुर्च्यांची फेकाफेक व नंतर दोन गट आमने-सामने आले. दगड फेकाफेक व धारदार शस्त्राने ही मारहाण झाली. त्यामुळे आठ ते नऊ जण रक्ताने माखले होते. घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. पोलिस आले तरी दोन गटांतील हाणामारी चालूच होती. परंतु पोलिसांनी दोन्ही गटांना शांत करून जखमींना प्रथम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांमध्ये शेख खलील शेख बुऱ्हाण, शेख मन्नान शेख कासम, शेख इरफान शेख रमजान, शेख लतीफ शेख बुऱ्हाण, शेख जमीर शेख जुमान प्यारेवाले, शेख शाहरुख शेख मन्नान, अजबर शेख बुऱ्हाण शेख, अजीज शेख बुऱ्हाण, शेख गुरू शेख कासीम, शेख अन्वर जुम्मा प्यारेवाले, चांद हिरा प्यारेवाले, शेख रमजान प्यारेवाले, रणू प्यारेवाले, नोमाज सय्यद मोसिन, रमजान मोहज प्यारेवाले, दाऊद जुम्मा प्यारेवाले, अय्युब कासीम प्यारेवाले, सलीम पीस प्यारेवाले, हकीम जुम्मा प्यारेवाले, मोहम्मद रमजान प्यारेवाले, शेख खालिद प्यारेवाले, मन्नान शेख काशीद, शेख अन्वर प्यारेवाले, इरफान रमजान प्यारेवाले, शेख अन्वर प्यारेवाले, चांद हिरा प्यारेवाले, शब्बीर रमजान प्यारेवाले या २७ जणांचा समावेश आहे. जखमींपैकी शेख खालिद प्यारेवाले, मन्नान शेख काशीद, शेख अन्वर प्यारेवाले, इरफान रमजान प्यारेवाले, शेख अन्वर प्यारेवाले, चांद हिरा प्यारेवाले, शब्बीर रमजान प्यारेवाले यांची प्रकृती गंभीर आहे.
    निवडणुकीपासून वाद
    या घटनेमागे भाजप पदाधिकारी हमीद प्यारेवाले आणि एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख बुऱ्हाण पहिलवान यांच्यातील वाद कारणीभूत असल्याचे बोलले जाते. हा वाद गेल्या विधानसभा निवडणुकीपासून चालू आहे. ९० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम मतदार असूनही गारमाळ येथील बूथवर गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त मतदान झाले होते. दरम्यान, याबाबत हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत चालू होती.

Post a Comment

 
Top