- 26/11 च्या हल्ल्यानंतर मुंबईत महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. 10 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सीएसटीएम, नरीमन हाउस, कामा हॉस्पिटल आणि इतर ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह अनेक जवान शहिद झाले होते. 26/11च्या हल्ल्यात शहिद झालेल्या लोकांच्या स्मृतिपित्यर्थ पोलिस जिमखाना येथ स्मारक उभारण्यात आले आहे.नरीमन हाऊसमध्ये संग्रहालय..26 नोव्हेंबर 2008 रोजी नरिमन हाऊसवरही पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. नरिमन हाऊसमध्ये संग्राहलय बनविण्यात येणार आहे. नरीमन हाऊसच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर संपूर्ण अंधार असेल. या अंधारात हल्ल्याच्या स्थितिचे चित्र दाखविण्यात येणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment