0
औरंगाबाद मराठवाड्याच्या हक्काचे पाणी राेखण्यासाठी सुप्रीम काेर्टापर्यंत लढा देणाऱ्या नाशिक- नगरकरांना अखेर काेर्टाच्याच अादेशानुसार गुरुवारी जायकवाडीसाठी पाणी साेडावे लागले. नाशिकच्या गाेदावरी-दारणा समूहातूनही पाणी सुटले. मात्र गंगापूर धरणातून हाेणारा विसर्ग अचानक थांबवण्यात अाला. विशेष म्हणजे १५ अाॅक्टोबरच्या आढावा बैठकीच्या वेळी गंगापूर धरणात पाण्याची तूट नव्हती. तरीही दुष्काळाचे निमित्त करून नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी २६ आॅक्टोबरला पाण्याची तूट असल्याचे दाखवले. त्या आधारे गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या आदेशाला मुख्य अभियंत्यांनी स्थगिती दिली. तत्पूर्वी सकाळी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. मात्र, तो प्रवाह थांबवल्याने साेडलेले कोट्यवधी लिटर पाणी कोरड्या नदीपात्रात जिरून जाणार आहे.

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा प्रश्न प्रचंड प्रतिष्ठेचा आणि राजकारणाचा करण्यात आल्यामुळे एेन दुष्काळात मराठवाडा विरुद्ध नाशिक आणि नगर जिल्हा असे चित्र निर्माण झाले आहे. जायकवाडी धरणात पाणी सोडू नये, या दोन्ही जिल्ह्यांच्या मागणीला सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली नाही. त्यामुळे नगर जिल्ह्यातून दोन दिवसांपूर्वी तर नाशिकच्या गंगापूर धरणातून आज सकाळी पाणी सोडण्यात आले. मात्र, नाशिकच्या मुख्य अभियंत्यांनी हे पाणी सोडण्याला तात्पुरती स्थगिती दिली.
राज्य सरकारने २३ आॅक्टाेबर रोजी नाशिक जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळसदृश असल्याचे जाहीर केले. ते निमित्त करून नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गंगापूर धरणातील पाण्याचे फेरनियोजन २६ आॅक्टोबर रोजी केले. यामुळे गंगापूर धरणात दिसत असलेले अतििरक्त पाणी अचानक तुटीत बदलले. ती तूट लक्षात घेऊन मुख्य अभियंत्यांनी लगेच गंगापूर धरणातून पाणी सोडायला तात्पुरती स्थगिती दिली.
पाेलिस बंदाेबस्त : वरील धरणांतून जायकवाडीत एकूण ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. गेल्यावेळी नगर-नाशिकमधून झालेल्या विराेधाचा अनुभव लक्षात घेता यंदा प्रशासनाने धरणांवर एसआरपीएफसह पोलीस बंदोबस्त तैनात केला अाहे.
निळवंडेतून ९३०५ क्युसेक : निळवंडे धरणातून ९३०५ क्युसेकने प्रवरा नदीत पाणी सोडण्यात आले. सुरुवातीला हा विसर्ग सकाळी ८.३० वाजता ६०५० क्युसेकने, दुपारी १२ वाजता ०९३०५ क्युसेकने वाढवला.
मुळा धरणातून ६ हजार क्युसेकने जायकवाडीत विसर्ग 
राहुरी | मुळा धरणातून गुरुवारी सकाळी जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात आले. "मुळा'चा पहिला दरवाजा सकाळी नऊ वाजता उघडण्यात आला. त्यानंतर साडेनऊ वाजेपर्यंत धरणाचे सर्व अकरा दरवाजे एक फूट उंचीवर उघडण्यात आले. जायकवाडीसाठी मुळा नदीपात्रात सहा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. मुळा धरणावर कडेकोट पोलिस बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत १,९०० दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाईल. मुळा धरणात सध्या १८३४० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडीला पाणी सोडल्यामुळे मुळा, प्रवरा नद्या दुष्काळी स्थितीतही पावसाळ्यासारख्या दुथडी भरून वाहतील.
या धरणांतून पाणी सोडले जाणार
१.९० टीएमसी पाणी मुळा समूहातून 
३.८५ टीएमसी प्रवरा समूहातून 
०.६० टीएमसी गंगापूर समूहातून 
२.०४ टीएमसी गोदा-दारणा समूहातून 
०.६० टीएमसी पालखेड समूहातून
नाशकातून ३.२४ एेवजी २.६४ टीएमसी येणार 
नाशिकमधील गंगापूर धरणातून सकाळी १० पासून सायंकाळपर्यंत ०.६ टीएमसीपैकी ०.०८ टीएमसी पाणी सोडण्यात आले. ०.५२ टीएमसी पाणी रोखण्यात आले आहे. दरम्यान, सकाळी १० वाजता दारणा आणि मुकणे या धरणांतून ३.२४ टीएमसी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. गंगापूर धरणातून येणारे पाणी अडवल्यामुळे अाता नाशिक जिल्ह्यातून ३.२४ एेवजी २.६४ टीएमसी पाणी जायकवाडीला मिळेल. गुरुवारी साेडलेले पाणी २२
तासांत जायकवाडीत पाेहाेचेल.
आणि नगर जिल्हा असे चित्र निर्माण झाले आहे. जायकवाडी धरणात पाणी सोडू नये, या दोन्ही जिल्ह्यांच्या मागणीला सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली नाही. त्यामुळे नगर जिल्ह्यातून दोन दिवसांपूर्वी तर नाशिकच्या गंगापूर धरणातून आज सकाळी पाणी सोडण्यात आले. मात्र, नाशिकच्या मुख्य अभियंत्यांनी हे पाणी सोडण्याला तात्पुरती स्थिगिती दिली. राज्य सरकारने २३ आॅक्टाेबर रोजी नाशिक जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळसदृष्य असल्याचे जाहीर केले. ते निमित्त करून नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गंगापूर धरणातील पाण्याचे फेर नियोजन २६ आॅक्टोबर रोजी केले. या फेर नियोजनामुळे गंगापूर धरणात दिसत असलेले अतििरक्त पाणी अचानक तुटीत बदलले. ती तूट लक्षात घेऊन मुख्य अभियंत्यांनी आज लगेच गंगापूर धरणातून पाणी सोडायला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
पाणी गेले वाया 
गंगापूर धरणातून सोडलेल्या पाण्याचा प्रवाह कायम ठेवला असता तर पाणी वाहत जायकवाडी धरणात आले असते. मात्र, तो प्रवाह अचानक थांबवण्यात आल्यामुळे लाखो लीटर पाणी आता नदीच्या कोरड्या पात्रात जिरून जाणार आहे. त्याचा ना नाशिकला फायदा होईल, ना जायकवाडीला. या हानीला कोण जबाबदार? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
पाणी गेले वाया : गंगापूरमधून सोडलेल्या पाण्याचा प्रवाह कायम असता तर पाणी जायकवाडीत आले असते. मात्र, प्रवाह थांबल्याने लाखो लीटर पाणी कोरड्या नदीपात्रात जिरून जाईल. त्याचा ना नाशिकला फायदा, ना जायकवाडीला. या हानीला कोण जबाबदार? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
नियामक आयोगाचा संबंधच नाही 
पाणी रोखण्याचा आदेश महाराष्ट्र जलस्त्रोत नियामक आयोगाने दिल्याचे प्रारंभी सांगण्यात येत होते. यावर आयोगाचे अध्यक्ष के.पी. बक्षी यांच्याशी थेट संपर्क साधून विचारणा केली तेव्हा असे आदेश देण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले. नंतर आयोगाचे सदस्य विनोद कुमार तिवारी यांनी तोंडी हे आदेश दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीही असे आदेश आपण दिलेले नसून मुख्य अभियंत्यांनी तो निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हा आदेश स्थानिक पातळीवरच घेतला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय
नाशिक मुख्य अभियंत्यांच्या निर्णयामुळे मराठवाड्यात तीव्र भावना आहेत. मराठवाडा विकास क्रांती दलाचे नेते माजी खासदार उत्तमराव पवार यांनी या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात तातडीने अवमान याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले. मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख यांनीही सरकारचे बेगडी मराठवाडा प्रेम उघडे पडले असल्याचे म्हटले. यात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अन्यथा शासनाचा खरा चेहरा मराठवाडा विरोधी असल्याचे उघड होईल, असे ते म्हणाले.
२.६४ टीएमसी येणारच 
गंगापूरमधून ०.६ पैकी ०.०८ टीएमसी पाणी सुटले होते. ०.५२ टीएमसी पाणी रोखण्यात आले. दरम्यान, दारणा-मुकणे धरणांतून पाणी सुटले आहे. त्यामुळे जायकवाडीत २२ तासांत २.६४ टीएमसी पाणी येणारच आहे.
News about Gangapur dam water issue

Post a Comment

 
Top