0
दोन चोरट्यास अटक
कराड,  : कराड शहरासह परिसरातून दुचाकी चोरून विक्री करणार्‍या दोघांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून आतापर्यंत 23 चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून आणखी 6 दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. शशिकांत रघुनाथ कांबळे (रा. तांदुळवाडी, जि. सांगली), अमोल अधिकराव कारंडे (वय 28, रा. कुंभारगाव, ता. पाटण) असे अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड, मलकापूर, सैदापूर परिसरात दुचाकी चोरी जास्त प्रमाणात झाल्या होत्या. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे रविवारी रात्री सह्याद्री रूग्णालयाजवळ शशिकांत कांबळे हा दुचाकी चोरटा येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्याच्याकडे कागदपत्राची विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.       
त्यास पोलीस स्टेशनला घेऊन येऊन विचारपूस केली असता त्याने वेगवेगळ्या परिसरातून 17 मोटारसायकली चोरल्या 
असल्याची कबुली दिली तर काही दुचाकी त्याने सांगली, कोल्हापूर तसेच कर्नाटक राज्यात विक्री केल्याचे सांगितले. त्याच्याकडून 15 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून 2 मोटारसायकली हस्तगत होण्याची शक्यता आहे. 
तर सोमवारी रात्री कृष्णा हॉस्पिटल परिसरात पोलीस पेट्रोलिंग करता असताना संशयित अमोल कारंडे याच्याकडे पोलिसांनी गाडीच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्यानेही उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणून विचारपूस केली असता त्याने आणखी दोघांना घेऊन 12 मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.  काही दुचाकी ढेबेवाडी पसिरात लावल्या असल्याचे व काही विक्री केल्याचे सांगितले. त्याच्याकडून 8 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून 4 मोटारसायकली हस्तगत होण्याची शक्यता आहे. ज्यांनी संशयितांकडून चोरीच्या दुचाकी खरेदी केल्या त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, पोलीस हवालदार राजेंद्र पुजारी, सतीश जाधव, प्रदीप कदम, नितीन येळवे, जयसिंग राजगे, संपत भोसले, पोलीस नाईक सचिन साळुंखे, संजय जाधव, प्रमोद पवार, सचिन गुरव, विनोद माने, गाडे, मारूती लाटणे, आनंदा जाधव यांच्या पथकाने केली. 

Image result for two wheeler

Post a Comment

 
Top