0
  • पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) १ मार्चपासून चालू होईल. बारावीची लेखी परीक्षा २० मार्चला, तर दहावीची लेखी परीक्षा २२ मार्चला संपणार आहे.

    परीक्षा वेळापत्रक मंडळाने गुरुवारी प्रसिद्ध केले. दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रके मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.


    शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून दहावीसाठी पुनर्रचित अभ्यासक्रम असल्याने पुनर्परीक्षार्थ्यांकरिता अंतिम संधी असलेल्या जुन्या अभ्यासक्रमाचे स्वतंत्र वेळापत्रक केले आहे. संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा-महाविद्यालयांकडे छापील स्वरूपातील वेळापत्रकावरून विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. अन्य संकेतस्थळ व व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल होणारी वेळापत्रके गृहीत धरू नयेत. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे शाळा-महाविद्यालयांना कळवले जाईल.HSC examinations will be held on February 21, and one from March 10

Post a Comment

 
Top