0
काल रात्रीपासून कल्याणमधील 20 टेकर्स मुरबाडजवळच्या हरिश्चंद्रगडावर अडकले होते. या टेकर्सची अखेर सुटका करण्यात आली आहे. या पर्यटकांनी किल्ला उतरायला सुरुवात केली आहे. हे टेकर्स सध्या कोकणकडय़ाचा 500 मीटरचा सुळका उतरत आहेत. अद्याप 300 मीटरचा एक सुळका त्यांना उतरावा लागणार आहे. त्यानंतर पुढच्या सात ते आठ तासांत हे टेकर्स त्यांच्या बेसकॅम्पला पोहोचतील.
कल्याण येथील डॉ. हितेश अडवाणी हे 20 जणांसोबत हरिश्चंद्रगड येथे टेकिंगसाठी गेले होते तेथून पुढे दीड किलोमीटरवर असणाऱया कोकणकडा येथे 1000 फूट खाली हे सर्व टेकर्स अडकले होते. या टेकर्सना एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने वाचविण्याचे प्रयत्न सुरू असून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण तहसीलदारांना पोलिसांची मदत घेऊन तसेच अडवाणी यांच्याशी समन्वय साधून टेकर्सची सुटका करण्याबाबत निर्देश दिले होते. अंधार पडल्यानंतर काल रात्री टेकर्सचे हे पथक वाट चुकले होते. परंतु पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी आणि एडीआरएपच्या जवानांच्या अथक प्रयत्नांनतर शोधण्यात यश मिळाले आहे.

Post a comment

 
Top