0
मुंबई- विविध मागण्यासाठी राज्यभरातील सुमारे 20 हजार शेतकर्‍यांचा विशाल मोर्चा ठाण्यातील आनंद नगरात दाखल झाला आहे. 22 नोव्हेंबरला हा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहे. मोर्चाने विधानसभेलाही घेण्याची तयारी केली आहे.
 • शेतकर्‍यांच्या मोर्चात ज्येष्ठ न्यायाधीश बी. जे. कोळसे-पाटील अध्यक्ष असून स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, जलपुरुष राजेंद्र सिंग, योगेंद्र यादव, कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव, सुभाष वारे, काळू राम काका दोधडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
  शेतकर्‍यांचा विशाल मोर्चा बुधवारी सायनच्या सोमय्या मैदानात येणार आहे. ठाण्यापासून 45 किलोमीटरचे अंतर पार करुन शेतकरी विधानभवनावर धडकणार आहेत. नंतर शेतकरी गुरुवारी आझाद मैदानावर ठिय्या देणार आहेत.
  विरोधी पक्षांचा शेतकरी मोर्चाला पाठिंबा..
  विरोधी पक्षांनी शेतकरी मोर्चाला पाठिंबा दिला आहे. याआधी मार्च महिन्यात 30 हजार शेतकर्‍यांनी मुंबईत आंदोलन केले होते. या आंदोलनाला काँग्रेस, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता.
  काय आहेत शेतकर्‍यांच्या प्रमुख मागण्या?
  - संपूर्ण कर्जमाफी.
  - कृषी उत्पादनाला दुप्पट दर मिळावा.
  - स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींवर अंमलबजावणी करावी.

  - वन अधिकार कायदयाची अंमलबजावणी व्हावी.
  - ज्या जमिनीवर आदिवासी शेती करत आहेत, ती त्यांच्या नावे करावी.
  - नदी जोड प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी मिळावे.

  - वीज बिलास सूट मिळावी.
  Farmers to march from Thane to Mumbai today

Post a comment

 
Top