ग्वाटेमाला सिटी - ग्वाटेमाला येथील एका कोर्टाने बुधवारी माजी सैनिकाला गृह युद्ध दरम्यान 201 शेतकऱ्यांचा नरसंहार केल्याप्रकरणी 5,160 वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हा नरसंहार मध्य अमेरिकेतील गृह युद्धाची सर्वांत क्रूर घटना होती. न्यायालयाने सांतोस लोगेज या माजी सैनिकाला त्या नरसंहारात 171 लोकांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवले. याबाबत कोर्टाने प्रत्येक हत्येसाठी 30-30 वर्षाची शिक्षा अशी एकूण 5,130 वर्षांची शिक्षा ठोठावली. इतकेच नाही तर माजी सैनिकाला एका लहान मुलाची हत्या केल्याप्रकरणी 30 वर्षांची अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment