वेस्ट इंडीजमध्ये आजपासून सुरू झालेल्या महिला T-20 विश्वचषकातील उद्घाटनीय लढतीत कर्णधार हरमनप्रीत कौरचे वेगवान शतक (१०३) व तिने चौथ्या गड्यासाठी जेमिमा राॅड्रीग्जसह केलेल्या १३४ धावांच्या शतकी भागीदारीमुळे भारतीय महिला संघाने तगड्या न्यूझीलंडपुढे विजयासाठी २० षटकांत १९५ धावांचे दमदार लक्ष्य ठेवले. अंतिम वृत्त हाती आले.
त्यावेळी न्यूझीलंड संघ ७ षटकांत १ फलंदाज गमावून ५४ धावांवर खेळत होता. भारतीय महिला संघाच्या फलंदाजीचे विशेष आकर्षण कर्णधार हरमनप्रीत कौरची वेगवान शतकी खेळी ठरली.तिने फटक्यांची आतषबाजी करताना ५१ चेंडूत ७ चौकार व ८ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने १०३ धावांची खेळी केली. २० व्या षटकात ती बाद झाली त्यावेळी तिने संघाला १९४ धावांवर पोहोचविले होते. तत्पूर्वी ३ बाद ४० धावा अशी भारतीय महिला संघाची दयणीय स्थिती होती. राॅड्रीग्ज आणि हरमनप्रीतने न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर तुटून पडताना शतकी भागीदारी करून मजबूत धावसंख्या उभारून िदली. राॅड्रीग्जने ४५ चेंडूत ७ चौकारांसह ५९ धावा केल्या.
भारतीय महिला क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजीचा िनर्णय घेतला. मात्र भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही. २२ धावांवर दोन्ही सलामीवीर तंबूत परतल्या. तानिया भाटियाने वेगवान सुरुवात केली. सहा चेंडूत दोन चौकार खेचून ती ९ धावांवर खेळत असताना ताहूहूच्या गोलंदाजीत त्रिफळाचित झाली. त्यानंतर तगडी फलंदाज अशी ख्याती असलेली स्मृती मनधानाही केवळ २ धावा करून तंबूत परतली. तिला ताहूहूच्या गोलंदाजीत जेनसेनने तिचा सुरेख झेल टिपला.
डी. हेमलतानेही आक्रमक फटकेबाजी सुरू करून दोन चौकारांसह ७ चेंडूत १५ धावा ठोकल्या. तिची राॅड्रीग्जसोबत जोडी जमणार असे वाटत असतानाच ती कॅस्पर्कच्या गोलंदाजीत ताहूहूच्या हाती झेल सोपवून तंबूत परतली. त्यानंतर राॅड्रीग्ज व हरमनप्रीतच्या जोडीने संघाच्या धावसंख्येला सुरेख आकार दिला .

Post a Comment