सिडनी - टीम इंडियाने दमदार पुनरागमन करताना रविवारी यजमान अाॅस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा टी-२० सामना जिंकला. भारताने निर्णायक तिसऱ्या सामन्यात १९.४ षटकांत ६ गड्यांनी विजयाची नाेंद केली. यासह भारताने ही तीन टी-२० सामन्यांची मालिका १-१ ने बराेबरीत ठेवली. मेलबर्न येथील दुसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला हाेता. तर, सलामी सामना जिंकून अाॅस्ट्रेलियाने अाघाडी घेतली हाेती. त्यामुळे तिसरा सामना भारतासाठी निर्णायक हाेता. नाणेफेक जिंकून अाॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १६४ धावा काढल्या हाेत्या.
प्रत्युत्तरात भारताने ४ गड्यांच्या माेबदल्यात विजयश्री खेचून अाणली. यामुळे मालिका बराेबरीत ठेवता अाली.कर्णधार विराट काेहली (नाबाद ६१) अाणि दिनेश कार्तिक (नाबाद २२) यांच्या अर्धशतकी भागीदारीच्या बळावर भारताने अापला विजय निश्चित केला. काेहलीने संघाच्या विजयासाठी झंझावाती अर्धशतकी खेळी केली. विजयात कृणाल (४/३६) अाणि काेहलीचे (नाबाद ६१) याेगदान महत्त्वाचे ठरले अाहे.
२०१७ नंतर राेखले : भारताने २०१७ नंतर अाता अाॅस्ट्रेलियाला मालिकेत बराेबरीत राेखले. यापूर्वी या दाेन्ही संघांत तीन टी-२० सामन्यांची मालिका झाली हाेती. यादरम्यान भारताने ही मालिका १-१ ने बराेबरीत ठेवली हाेती. त्यानंतर अाता टीमला हे यश संपादन करता अाले.
६ डिसेंबरपासून भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यातील कसाेटी मालिकेला सुरुवात हाेईल. या दाेन्ही संघात तीन कसाेटी सामने हाेणार अाहेत. यातील दुसऱ्या कसाेटीला १४ डिसेंबर राेजी सुरुवात हाेईल.त्यानंतर २६ डिसेंबरपासून हे दाेन्ही संघ तिसऱ्या कसाेटीसाठी समाेरासमाेर असतील.
Post a Comment