0
दिवाळीसाठी पुण्याहून बार्शी आणि लातूरकडे निघालेल्या दोन बसना आज पहाटे वेगवेगळय़ा ठिकाणी अपघात झाला. यात 19 प्रवासी जखमी झाले आहेत. हे दोन्ही अपघात चालकाला झोप अनावर झाल्यानं झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
पुण्यातून बार्शीकडे निघालेल्या एसटी बसला टेंभुर्णी कुर्डुवाडी रस्त्यावर अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात 12 प्रवासी जखमी झाले. त्यातील सात प्रवासी गंभीर जखमी असून, त्यांच्यावर टेंभुर्णी आणि सोलापूर येथील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर पुणे येथून लातूरकडे निघालेली खासगी बस इचगावजवळ उलटली. यात सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवले आहे.

Post a Comment

 
Top