0
  • Vice Admiral M.P. Avti passed away; Pakistan had destroyed 3 ships in 1971 warमुंबई - भारतीय नौदलातील निवृत्त व्हाइस अॅडमिरल एम.पी. अवती यांचे ९१ व्या वर्षी निधन झाले. १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. अवती यांच्या नेतृत्वात नौदलाच्या ईस्टर्न फ्लीट युनिटने पाकिस्तानची ३ जहाजे उद्ध्वस्त केली होती. त्या वेळी अवती युनिटचे कमांडिंग ऑफिसर होते.


    १९७१ च्या युद्धातील त्यांचा आणखी एक किस्सा खूप चर्चेत होता. १८ डिसेंबर १९७१ रोजी कॅप्टन स्वराज प्रकाश यांनी अवती यांना बांगलादेशच्या (तत्कालीन पाकिस्तानचा भाग) चटगावकडे जाण्याचे निर्देश दिले. त्या वेळी चटगावची स्थिती खूप वाईट होती. हा भाग भारतीय सैन्याच्या नियंत्रणापासून खूप दूर होता. स्वराज प्रकाश आणि अवती चटगावला पोहोचले. त्यांना सर्व महिलांनी घेराव घालत मदत करण्याची मागणी केली. सुटका करण्यात यावी, असे त्या म्हणत होत्या. दोघांनी महिलांना सुरक्षित स्थळी पोहोचवले. यासोबतच पाकिस्तानच्या २ वरिष्ठ अधिकाऱ्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले.
    दोन्ही पाक अधिकाऱ्यांनी अवती यांच्यासमोर बंदुका ठेवून आत्मसमर्पण केले. ३८ कॅलिबरच्या त्या दोन रिव्हॉल्व्हर तेव्हापासून भारतीय सैन्याकडे ऐतिहासिक वारसा म्हणून ठेवण्यात आल्या आहेत. या वर्षीच अवती यांच्या हस्ते दोन्ही बंदुका नॅशनल डिफेन्स अकॅडमीकडे सोपवण्यात आल्या. १९७१ च्या युद्धात अद्वितीय शौर्य दाखवल्याबद्दल त्यांना वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अवती १९४५ पासून नौदलात कार्यरत होते. त्या वेळी त्यांना रॉयल इंडियन नेव्हीसाठी (आरआयएन) निवडले गेले. त्यांनी ब्रिटनच्या रॉयल नेव्हल कॉलेज आणि नेव्हल स्पेशालिस्ट स्कूलमधून प्रशिक्षण घेतले होते. मार्च १९५० मध्ये ते भारतीय नौदलाच्या सेवेत परतले.
    १९८३ पर्यंत ते नौदलात कार्यरत होते. १९५२ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी भारतीय नौदलाला त्यांचे ध्वज सोपवले तेव्हा सैन्याकडून ध्वज स्वीकारणाऱ्या शिष्टमंडळात अवती यांचा सहभाग होता. सिंगल कम्युनिकेशन म्हणजेच बेसकडून येणाऱ्या संकेतांना समजून घेत त्या दृष्टीने कारवाई करण्यात ते निष्णात होते. अवती यांना परमविशिष्ट मेडलनेही सन्मानित करण्यात आले. १९८२ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समितीमध्ये ते सामील होते.

Post a Comment

 
Top