- कोल्हापूर - महालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापुरात आहे. येथे अनेक शासक आले आणि गेले. मात्र, १३०० वर्षे प्राचीन या मंदिरातील पूजेची परंपरा सदैव कायम राहिली. मंदिराच्या साप्ताहिक पूजेत ५४ पुरोहित कुटुंब सहभागी होत आले आहेत. यातील एका कुटुंबातील सदस्य योगेश पुजारी म्हणाले, महालक्ष्मीची मूर्ती मंदिर बांधकाम होण्याआधीपासून अस्तित्वात आहे. तेव्हापासून इथे पूजेची अखंड परंपरा सुरू आहे. इतिहासकार योगेश प्रभुदेसाई यांच्या म्हणण्यानुसार, मूळ मंदिराचे बांधकाम सातव्या शतकातील चालुक्य शासक कर्णदेव यांनी केले होते.
११ व्या शतकात कोल्हापूरचे शिलाहार राजघराण्यावेळी मंदिराचा विस्तार झाला. शिलाहार वंशाचे राजा कर्नाटकमध्ये कल्याण चालुक्यांच्या अधिपत्याखाली कोल्हापूरमध्ये शासन करत होते. मंदिराच्या आसपास शिलाहार राजघराण्याशिवाय तेराव्या शतकापर्यंत शिलाहार घराण्याची सत्ता राहिली. मात्र, त्यानंतर देवगिरीच्या यादवांचा काळ आला. शेकडो वर्षांच्या उलथापालथीत कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर कायम राहिले. १७१५ मध्ये मंदिराची पुनर्स्थापना करण्यात आल्याचा उल्लेख आहे. देवगिरीत यादवांच्या पराभवानंतर येथील वैभव थोडे कमी झाले. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयानंतर पुन्हा गतवैभव प्राप्त झाले.अनेक प्राचीन स्मारके भग्न होण्यापासून रोखली गेली. पूजेची परंपराही कायम राहिली. कोल्हापूरमध्ये शिवाजी महाराजांचे वंशज आजही आहेत. मंदिराजवळील भव्य राजवाडा ही त्यांचीच वास्तू आहे. संभाजी राजे शिवाजी महाराजांच्या वंशपरंपरेतील येथील एक आदरयुक्त व्यक्तिमत्त्व आहे. १९५५ पर्यंत प्राचीन मंदिर छत्रपती घराण्याच्या अधिपत्याखाली होते, आता त्यावर सरकारचे नियंत्रण आहे. सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील म्हणाले, अंबाबाई देवघरात राष्ट्रपती व छत्रपतीच केवळ सामान्य पोशाखत गर्भगृहापर्यंत जाऊ शकतात.महालक्ष्मीची ही मूर्ती दोन हजार वर्षांपूर्वीचीमहालक्ष्मीची दोन फूट नऊ इंच मूर्ती सुमारे २ हजार वर्षांपूर्वीची सांगितले जाते. मूर्तीमध्ये महालक्ष्मीस चार भूजा आहेत. महालक्ष्मीच्या हाती तलवार, गदा, ढाल इत्यादी शस्त्रे आहेत. मस्तकावर शिवलिंग, नाग मागे वाघ आहे. घर्षणामुळे झीज होऊ नये म्हणून चार वर्षांपूर्वी आैरंगाबादच्या पुरातत्त्व विभागाने मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया केली होती. त्या अगोदर १९५५ मध्ये रासायनिक लेप लावण्यात आला होता. महालक्ष्मीची पालखी सोन्याची आहे. २६ किलो सोन्यापासून ती बनलेली आहे. दर नवरात्रीस मातेची शोभा यात्रा कोल्हापूर शहरातून काढली जाते.मूळ मंदिराचे बांधकाम सातव्या शतकातील चालुक्य शासक कर्णदेव यांनी केले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment