0
  • the winter session of the legislative assembly will be from 19 Novemberमुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईत हाेणार अाहे. १९ नोव्हेंबरपासून त्याची सुरुवात हाेत असल्याची माहिती राज्याचे संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी दिली. विधानसभा व विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. सुमारे दाेन अाठवडे म्हणजे ३० नाेव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात राज्यातील दुष्काळाचा मुद्दा गाजण्याची चिन्हे अाहेत. बापट म्हणाले, 'विधानसभेत प्रलंबित असलेली आठ विधेयके तसेच विधान परिषदेची दोन प्रलंबित विधेयके या अधिवेशनात मांडण्यात येतील. अधिवेशनात दुष्काळावरही महत्त्वपूर्ण चर्चा होणार अाहे.

    दरम्यान, दुष्काळासह राज्यातील अनेक समस्यांनी उग्र रूप धारण केलेले असताना त्यावर त्यावर विस्तृत चर्चा करण्याएेवजी केवळ दाेनच अाठवडे अधिवेशन ठेवून सरकार कामकाज उरकण्याचा प्रयत्न करत असल्याचा अाराेप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. त्यावर आवश्यकता भासल्यास सुटीच्या दिवशी कामकाज चालू ठेवण्यात येईल. अंतिम आठवड्यात कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन अधिवेशनाचे दिवस वाढवण्यासंदर्भात चर्चा करण्यात येईल, असे बापट यांनी सांग

Post a Comment

 
Top