नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपयातील मजबुती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत होत असलेल्या घसरणीमुळे भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरकपातीचा सिलसिला शनिवारीही कायम राहिला.
दिल्लीत शनिवारी पेट्रोल १७ पैशांनी स्वस्त होत ७७.८९ रुपये प्रति लिटरवर आले. डिझेलही १६ पैशांनी स्वस्त होत ७२.५८ रुपये लिटरवर आले. मुंबईतही १७ पैशांच्या दर कपातीनंतर पेट्रोल ८३.४० रुपये प्रतिलिटर झाले. डिझेल १७ पैशांनी स्वस्त होत ७६.०५ रुपये लिटरवर आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment