0
 • Drought in Maharashtra 26 District Announced by Maharashtra govtमुंबई- राज्य सरकारने 26 जिल्ह्यांतील 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. 112 तालुक्यात गंभीर आणि 39 तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे सूत्रांनी सांग‍ितले आहे. यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे बहुतांश जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तलाव, विहिरी कोरडया पडल्या आहेत. पाण्याची, चाऱ्याची गंभीर टंचाई आतापासून जाणवू लागली आहे. दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांत आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

  दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यातील पालकमंत्र्यांना दुष्काळी दौरा करण्याचे काम दिले होते. अहवाल समोर आल्यानंतर राज्यातील एकूण 180 तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याचे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी राज्य सरकारकडून राज्यातील 151 तालुक्यांचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात आला आहे.
  राज्यात या 112 तालुक्यात गंभीर स्वरुपाचा दुष्काळ.... 
  सांगली (5) : जत, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, आटपाडी, तासगांव
  सातारा (1) : माण-दहीवडी
  सोलापूर (9) : करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर
  पालघर (3) : पालघर, तलासरी, विक्रमगड
  धुळे (2) : धुळे, सिंदखेडे
  जळगाव (13) : अमळनेर, भडगांव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल
  नंदुरबार (3) : नंदुरबार, नवापूर, शहादा
  नाशिक (4) : बागलान, मालेगांव, नांदगांव, सिन्नर
  अहमदनगर (11) : कर्जत, अहमदनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, रहाता, रोहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड
  औरंगाबाद (9) : औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड,सोयगाव, वैजापूर, कन्नड
  बीड (11) : आष्टी, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, शिरुर (कासार), वडवणी, केज, आंबेजोगाई, परळी, पाटोदा,
  जालना (7) : अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसांगवी, जाफ्राबाद, जालना, परतूर

  नांदेड (2) : मुखेड, देगलूर
  उस्मानाबाद (7) : लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम
  परभणी (6) : मनवथ, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू
  हिंगोली (2) : हिंगोली, सेनगाव
  अमरावती (1) : मोर्शी
  बुलडाणा (7) : खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा
  यवतमाळ (6) : बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव
  चंद्रपूर (1) : चिमूर
  नागपूर (2) : काटोल, कळमेश्वर
  राज्यात या 39 तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ...
  पुणे (7) - आंबेगाव, पुरंदर, सासवड, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर, शिरुर-घोडनंदी
  सातारा (2) - कोरेगांव, फलटण
  धुळे (1) - शिरपूर
  नंदुरबार (1) - तळोदे
  नाशिक (4) - देवळा, इगतपुरी, नाशिक, चांदवड
  नांदेड (1) - उमरी
  हिंगोली (1) - कळमनुरी
  लातूर (1) - शिरुर अनंतपाळ
  अकोला (5) - बाळापूर, बार्शिटाकळी, मुर्तिजापूर, तेल्हारा, अकोला
  अमरावती (4) - अचलपूर, चिखलदरा, वरुड, अंजनगांव सुर्जी
  बुलडाणा (1) - मोताळा
  वाशिम (1) - रिसोड
  यवतमाळ (3) - केलापूर, मारेगांव, यवतमाळ
  चंद्रपूर (4) - ब्रम्हपुरी, नागभीड, राजुरा, सिंदेवाही
  नागपूर (1) - नरखेड
  वर्धा (2) - आष्टी, कारंजा
  शेतकऱ्यांची दुष्काळात होरपळ, मुख्यमंत्री फाइव्ह स्टार हॉटेलात- अशोक चव्हाण
  शेतकरी दुष्काळात होरपळत असताना मुख्यमंत्री, मंत्री सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंचतारांकित हाॅटेलात आनंदोत्सव साजरा करीत आहेत. नापिकीमुळे राज्यातील पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याचे सरकारला सोयर सतक नाही. ‘बेटी बचाव बेटी पढाव’चा नारा देणारा भाजप आता ‘बेटी भगाव’चा नारा देत अाहे. या सरकारला खाली खेचून काँग्रेसचे सरकार आणा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी येथे केले.
  जनसंघर्ष यात्रेनिमित्त सिल्लोड येथे मंगळवारी रात्री आयोजित सभेत खा. चव्हाण बोलत होते. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ सिने अभिनेते तथा उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष राज बब्बर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा अध्यक्ष तथा आ.अब्दुल सत्तार, सत्यजित तांबे, माजी आमदार कल्याणराव काळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, नगराध्यक्ष अब्दुल समीर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

 
Top