- इंग्लंडमध्ये एका व्यक्तीने आपल्या घरात पारलौकिक शक्ती पाहिल्याचा दावा केला आहे. त्या व्यक्तीची 13 महिन्यांची मुलगी एकटीच झोपली होती. यानंतर वडिलांनी जेव्हा खोलीतील सीसीटीव्ही फुटेज पाहिला, तेव्हापासून वडिलांची झोप उडाली आहे. त्यांना आपल्या मुलीच्या शरीरावर एक विचित्र सावली दिसून आली आहे. प्रत्यक्ष ती गोष्ट पाहण्यासाठी वडील खोलीत गेले तेव्हा खोलीतून ती गोष्ट गायब झाली होती. यापूर्वीही आपल्या मुलीच्या शरीराभोवती एक बाहुली फिरताना पाहिल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. त्याने आपल्या घरात पॅरानॉर्मल इंव्हेस्टिगेटर्सची मदत मागितली आहे.Video मध्ये नेमके काय दिसले?
> ब्लीथ शहरात राहणारे 31 वर्षीय स्टीफन आर्मस्ट्रॉन्ग यांनी आपली मुलगी एलाच्या खोलीत ही विचित्र गोष्ट पाहिल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, त्यांना हा कथित भूत फक्त कॅमेऱ्यात दिसतो. प्रत्यक्षात तो एकदाही पाहण्यात आलेला नाही. स्टीफन म्हणाले, की "मला एक दिवस एला झोपेत असताना तिच्या रुममध्ये विचित्र प्रकाश दिसून आला. भूतांवर मला विश्वास नाही. परंतु, खरोखर तेथे जे काही होते ते पाहून मी प्रचंड घाबरलो."
> स्टीफनने सांगितले, की फुटेज पाहिल्यानंतर तो भीतीने स्तब्ध झाला होता. यानंतर हिंमत करून तो मुलीच्या खोलीत गेला. तेव्हा मात्र, त्याला काहीच दिसले नाही. यानंतर मुलीच्या बेडजवळ धूळ दिसून आली. एक विचित्र सावली एका ठिकाणावरून उडून दुसऱ्या ठिकाणी जात होती. जे काही पाहिले त्यानंतर आपल्याला झोप येत नाही असे स्टीफनने सांगितले आहे.यापूर्वी दिसली रहस्यमयी बाहुली
स्टीफनने सांगितले, की त्याने घरात पॅरानॉर्मल हालचाली पाहिल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्याने अशीच एक घटना अनुभवली होती. त्याची मुलगी अशीच एका खोलीत एकटी झोपली होती. त्याचवेळी तिच्या बिछान्यावर एक विचित्र बाहुली दिसून आली. ती गोष्ट सुद्धा त्याने व्हिडिओमध्येच पाहिली होती. प्रत्यक्षात जाऊन पाहिल्यावर सर्व काही व्यवस्थित होते.काय म्हणाले पॅरानॉर्मल इंव्हेस्टिगेटर?
पॅरानॉर्मल इंव्हेस्टिगेटर सॅमी रॉलिन्सनने सांगितले, की "मी फुटेज पाहिले तेव्हा एक प्रकाशमान सावली दिसून आली. आणखी पाहिले असता ती सावली मुलीच्या भोवती फिरत असल्याचेही दिसते. जवळपासच्या परिसरात किंवा घरात यापूर्वी राहणाऱ्यांपैकी कुणा-कुणाचा मृत्यू झाला, त्या सर्वांच्या मृत्यूच्या तारखा सध्या तपासून पाहिल्या जात आहेत. ही एक मनुष्य किंवा घरात मृत्यूमुखी पडलेल्या कुत्र्याचीही आत्मा असू शकते."यापूर्वीही आपल्या मुलीच्या शरीराभोवती एक बाहुली फिरताना पाहिल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment