- यवतमाळ - गेल्या दीड वर्षापासून 13 जणांचा बळी घेणाऱ्या टी-1 वाघिणीला ठार करण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. वनविभागाच्या शोध पथकाला शुक्रवारी रात्री टी-1 वाघिणी दिसली. तिला जेरबंद करण्यासाठी पथकाचे प्रयत्न सुरू होते. तिनं शोध पथकाच्या दिशेनं हल्ला केला. अखेर शार्प शूटर अजगर अलीनं गोळ्या झाडून तिला ठार केलं. रात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती वन विभागाच्या सुत्रांनी दिली. बोराटीच्या जंगलात या वाघिणीला ठार करण्यात आले. वाघिणीचा पंचनामा करून तिच्यावर लवकरच शवविच्छेदन करण्यात येणार आहे. तिला नागपुरात हलवण्यात आले आहे.
'अवनी'ने त्रासून सोडले होते:तब्बल १३ जणांचा जीव घेणारी नरभक्षक वाघिण 'अवनी'ने वनविभागासह संपूर्ण यंत्रणेला अक्षरश: भांडावून सोडले होते. पकडण्यासाठी लागणाऱ्या यंत्रासाठी कोट्यवधी रुपयांची साधनसामग्री, मनुष्यबळ उभे करूनही ही वाघिण तावडीत सापडायला तयारच नव्हती. या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. वाघिणीला पकडण्यासाठी मध्यप्रदेशातून चार हत्ती आणण्यात आले होते. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या एका पिसाळलेल्या हत्तीनेच महिलेला ठार केल्याची घटना घडली होती. त्याचबरोबर ५ शार्पशुटर, ३ मोठे पिंजरे, ५०० वन कर्मचाऱ्यांची फौज वाघिणीचा शोध घेत होती. तसेच पॅरामिटरच्या मदतीने हवाई शोधदेखील घेण्यात आला होता. परंतु या सर्व प्रयत्न निष्फळ ठरले होते. तिला पकडण्यासाठी थेट हैदराबादहून शार्पशूटरला बोलावण्यात आले होते. शिवाय, पॅरामोटार आणि अन्य अत्याधुनिक यंत्रणाही तैनात करण्यात आल्या होत्या. अखेर तिला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.काय म्हणाले वनाधिकारी?ही कारवाई वनकर्मचाऱ्यांनी फत्ते केली असून या मोहिमेत वाघीणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, टी-१ वाघिण चाल करून आल्याने तिला ठार करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. त्यामुळे शूटर अजगर अली खान यांनी निशाणा साधला.
- के. एस. अभरणा, उपवनसरक्षक, पांढरकवडा
तब्बल १३ जणांचा जीव घेणारी नरभक्षीण वाघिण 'अवनी'ने वनविभागासह संपूर्ण यंत्रणेला अक्षरश: भांडावून सोडले होते.
You Might Als
Post a Comment