0
लंडन - लंडनमध्ये एका रेल्वे स्टेशनच्या जवळ नवा रेल्वे ट्रॅक अंथरण्यासाठी खोदकाम केले जात होते. परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांचा लवकरच एका भयंकर घटनेशी सामना झाला. खोदकामादरम्यान अचानक एकानंतर एक मानवी सापळे निघू लागले. तासाभरातच या सापळ्यांची संख्या 1200 पर्यंत पोहोचली. यानंतर या साइटवर रेल्वेने काम रोखून परिसराला घेराबंदी केली. तपासात मोठे आश्चर्यचकित कारण समोर आले.

- एकानंतर एक सांगाडे निघताच घटनास्थळी पुरातत्त्व शास्त्रज्ञांची टीम बोलवण्यात आली. या टीमने ज्या बाबी सांगितल्या त्या चकित करणाऱ्या होत्या. शास्त्रज्ञ म्हणाले की, या जागेवर 60 हजार लोकांचे अवशेष आढळू शकतात. परंतु एवढ्या मोठ्या संख्येने येथे मृतदेह दफन का दफन केले असतील, हाच मोठा प्रश्न होता.
उलगडणार 10 हजार वर्षे जुने रहस्य
- यूस्टनपासून बर्मिंघमदरम्यान असलेल्या या जागेचा बारकाईने अभ्यास केल्यावर कळले की, या जागेचा संबंध 10 हजार वर्षांपूर्वीच्या मानवी संस्कृतीशी होता. सुरुवातीला येथे 230 वर्षांपूर्वी इंग्लंडमधील रहिवाशांचे सापळे आढळले होते, परंतु हळूहळू काही अशा कबरी आढळल्या ज्या खूप प्राचीन होत्या.
परिसराचे झाले छावणीत रूपांतर
- एवढ्या मोठ्या संख्येने कबरी आढळल्याने पूर्ण ब्रिटनमध्ये खळबळ माजली. यानंतर हा परिसर छावणीत रूपांतरित करण्यात आला. सूत्रांनुसार, रेल्वेने शोध पूर्ण होईपर्यंत काम थांबवले आहे. हा पूर्ण परिसर झाकण्यात आला असून शोधकार्याला वेगाने सुरुवात झाली आहे.
आतापर्यंत सर्वात मोठा शोध
- या शोधकार्याचे नेतृत्व करत असलेले एक्स्पर्ट मार्क थर्स्टन म्हणाले, ब्रिटनमध्येच नाही, तर पूर्ण जगभरात हा या प्रकारचा सर्वात मोठा शोध सिद्ध होऊ शकतो. येथे लागलेल्या वर्कफोर्सनेही एक रेकॉर्ड बनवला आहे. वर्तमानात येथे हजारोंच्या संख्येने वर्कर आहेत, ज्यांच्यात पुरातत्त्व शास्त्रज्ञ आणि पोलिसही सहभागी आहेत.

काम रोखून पूर्ण परिसर घेरला, मग 250 वर्षे जुने सत्य आले समोर

  • Mass dig of 60,000 skeletons from 230-year-old cemetery, London Secrets to Be Revealed

Post a Comment

 
Top