0
औरंगाबाद - सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर जायकवाडीच्या हक्काचे पाणी गुरुवारी नाशिक-नगरच्या धरणांतून सोडण्यास सुरुवात झाली होती. मात्र, नाशकातील गंगापूर आणि पालखेड धरणांतील पाणी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने कुठलीही स्थगिती दिली नसतानाही रोखण्यात आले होते. या प्रकारानंतर मराठवाड्यातून प्रचंड टीका झाली होती. आता अखेरीस दोन्ही प्रकल्पांतून सोडण्यात येणारे प्रत्येकी ०.६० टीएमसी असे १.२० टीएमसी पाणी आता एकट्या दारणा धरणातून सोडण्यात येणार आहे. गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहीरकर यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, जायकवाडीत शनिवारी संध्याकाळपर्यत १३ दलघमी पाण्याची आवक झाली होती.

जायकवाडीला दारणातून मिळणार उर्वरित पाणी
दारणा समूहातून एकूण २.०४ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. गंगापूर आणि पालखेडमधून पाणी न सोडल्यामुळे अधिकचे १.१० टीएमसी पाणी दारणातून सोडले जाईल. गंगापूरमधून ०.०८ टीएमसी इतकेच पाणी सोडले होते. त्याची भरपाई दारणातून करण्यात येणार आहे. याबाबत नाशिक मुख्य अभियंत्याकडूनच नियोजन करून महामंडळाला पाठवले होते. कार्यकारी संचालकांनी त्याला मान्यता दिल्याचे कोहीरकर यांनी सांगितले.
वरील धरणांतून जायकवाडीत असा सुरू आहे विसर्ग 
जायकवाडीत संध्याकाळपर्यंत १३ दलघमी पाण्याची आवक झाली. त्यामुळे पाणीसाठा २९.५०% झाला. उपयुक्त पाणीसाठा ६३९ दलघमी आहे. सध्या मुळा धरणातून ४ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. दुपारी ३ वाजता तो १२ हजार होता. निळवंडेमधून ७३८७ व दारणामधून ९३८७ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. सध्या नांदूर-मधमेश्वरमधून ११ हजार १९२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. नेवासामधून १३ हजार ९५६ क्युसेक पाणी येत आहे. दारणातून आणि मुकणेतून आतापर्यंत मिळून २०२२ तसेच २०२ दलघफू इतके पाणी नांदूर-मधमेश्वरमध्ये सोडले आहे.
बेकायदा कृत्य केल्यामुळे कारवाई केली जावीच
आता पाणी सोडून चुकीची दुरुस्ती केली असली तरी आधी केलेले कृत्य बेकायदेशीर आहे. त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. जेणेकरून पुढे अशी चूक होणार नाही. तसेच समन्यायी पाणी वाटपाबाबतचे गांभीर्य पाळले.
- प्रदीप देशमुख, मराठवाडा जनता विकास परिषद
Gangapur-Palchhed damages to 1.20 TMC of water supply; Marathwada's water

Post a Comment

 
Top