0
गुडगाव - पत्नीच्या मृत्यूनंतर एक बाप आपल्या अवघ्या 12 वर्षीय मुलीवर सतत बलात्कार करू लागला. विरोध केल्यावर तिला बेदम मारहाण करून गुडगाव परिसरात एका घरात कैदेत ठेवले. तेथे त्याने अनन्वित अत्याचार सुरूच ठेवले. यानंतर 3 दिवसांपूर्वीच त्याने दिल्लीत येऊन स्वत:हून मुलगी किडनॅप झाल्याची तक्रार इंद्रपुरी पोलिसांत दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला. मुलीचा शोध घेऊन तिला गुडगाव परिसरातून ताब्यात घेतले.

पीडित मुलीचे बोलणे ऐकून पोलिसही झाले अवाक
काउंसलिंगदरम्यान मुलीने घटनेबाबत सांगितले तेव्हा पोलिसही चकित झाले. कारण त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् बलात्कार करणारा दुसरा कोणी नसून तिचा सख्खा बापच होता. पीडितेने सांगितले की, तिच्या बापाला दारूचे व्यसन आहे. दारू प्यायल्यानंतर तो तिच्यासोबत अश्लील कृत्य करत होता. मागच्या काही दिवसांपासून त्याने गुडगावमध्ये तिला एका घरात डांबून ठेवलेले होते. तेथे तो सातत्याने बलात्कार करत होता. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार व अपहरणाचा गुन्हा दाखल करून गजाआड केले आहे.
विरोध केल्यावर बेदम मारायचा, मग करायचा पाशवी अत्याचार
- पोलिसांच्या मते, पीडितेच्या कुटुंबात तिचे वडील आणि सावत्र आई आहे. तिच्या आईचा अनेक वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. ती घराजवळच्याच एका शाळेत शिकते. अल्पवयीन मुलगी म्हणाली की, नशे तर्रर होऊन घरी आल्यावर बाप तिच्यासोबत अश्लील कृत्य करत होता. विरोध केल्यावर आरोपी बापाने तिला बेदम मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी देत कुणालाही याबाबत सांगण्यास मनाई केली.
- यादरम्यान जेव्हा मुलीने एका दिवशी पूर्ण ताकदीने विरोध केला तेव्हा आरोपीने तिला गुडगावमधील एका घरात डांबून ठेवले. यानंतर आरोपीने स्वत:हूनच पोलिसांत मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली. सध्या पोलिस आरोपीची चौकशी करत आहेत.

मग मुलीने बापाबद्दल जे सांगितले, ते ऐकून पोलिसही झाले स्तब्ध

  • Father Reped 12 year Daughter beat her while protest in Gurugram

Post a Comment

 
Top