भोपाळ / ऐझॉल - मध्य प्रदेश आणि मिझोरममध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली. या दरम्यान एकट्या मध्य प्रदेशातच तब्बल 100 हून अधिक ईव्हीएम मशीन बिघडल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्यामुळे, राजधानी भोपाळच्या इमली आणि शाहपुरा येथे मतदानाला 20 मिनिटे उशीराने मतदान सुरू झाले. तर सतना भिंड, ग्वाल्हेर, इंदूर, उज्जैन आणि खरगोनच्या अनेक ठिकाणी मतदानाला अर्धा तास विलंब झाला. कुठल्याही ठिकाणी ईव्हीएम बिघडल्यास 30 मिनिटांच्या आत ते दुरुस्त केले जात आहे असा दावा राज्य निवडणूक आयुक्त बीएल कांताराव यांनी केला आहे.मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बुधनी येथे मतदान केले. मत टाकण्यापूर्वी त्यांनी नर्मदा नदी आणि कुलदेवीच्या मंदिरात पूजा-अर्चना केली. सोबतच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष कमलनाथ यांनी छिंदवाडा येथील हनुमान मंदिरात आरती केली. त्यानंतर मतदानाचा हक्का बजावला. तर दुसरीकडे मिझोरमच्या 40 विधानसभा जागांसाठी देखील मतदान झाले. यात सकाळी 9 वाजेपर्यंत 15% मतदानाची नोंद झाली आहे. या निवडणुकीचे निकाल 11 डिसेंबर रोजी घोषित केले जाणार आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment