- मुंबई- ग्रेटर नोएडामध्ये एका महिलेने ब्लॅकमेलिंग करून व्यक्तीला बनावट रेपकेसमध्ये अडकवल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, महिलेने पीडित व्यक्तीकडे 10 लाख रुपयांची डिमांड केली होती. पैसे न दिल्याने तिने त्याला रेप केसमध्ये अडकवल्याची धमकीही दिली होती. परंतु पीडित व्यक्ती महिलेच्या धमकीला बळी पडला नाही. त्याने सर्तकता दाखवत पोलिसांना हे प्रकरण सांगितले. सूरजपूर पोलिस स्टेशनमध्ये महिलेच्या विरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे.
कोण तुमच्या विरोधात खोटी FIR दाखल करत असेल तर...- तुमच्या विरोधात एखाद्या महिलेने पोलिसात खोटी FIR नोंदवली असेल ता तुम्ही त्याला आव्हान देऊ शकतात. तुमच्याकडे ठोस पुरावे असतील तर हायकोर्टातून तुम्ही सहीसलामत बाहेर पडू शकतात. या प्रकरणी हायकोर्ट वकील संजय मेहरा यांनी सांगितले की, भादंवि कलम 482 नुसार तुम्ही अशा FIR ला कोर्टात आव्हान देऊ शकतात. कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करू शकतात. तुमची विनंती कोर्टाने मान्य केल्यास तुम्हाला दिलासा मिळू शकतो.- कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करताना तुम्ही निर्दोष आहात, याचाही पुरावा. तुम्ही सादर करू शकतात.- जसे की, व्हिडिओ रेकॉर्डिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग, फोटोग्राफ्स, डॉक्युमेंट्स प्रतिज्ञापत्रासोबत जोडू शकतात.- चोरी, मारहाण, बलात्कार अशा विविध खटल्यात तुम्हाला एखाद्या महिलेने अडकविण्याचा प्रयत्न केला असेल तर, त्याविरोधात तुम्ही हायकोर्टात आव्हान देऊ शकतात.- हायकोर्टात खटाला सुरु असल्याने पोलिस तुमच्या विरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई करू शकत नाही. एवढेच नाही तर तुमच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आला असला तरी पोलिस तुम्हाला अटक करू शकत नाहीत. कोर्ट या प्रकरणी चौकशी अधिकार्याला काही दिशा-निर्देश देऊ शकते.- हायकोर्टमध्ये याचिका दाखल करण्याआधी एक फाइल तयार करा. या फाइलमध्ये एफआयआरची प्रतसोबत प्रतिज्ञापत्र आणि आवश्यक पुरावे जोडून घ्या. तुम्ही वकीलाकडून प्रतिज्ञापत्र तयार करू शकतात. तुमच्या बाजुने कोर्टात कोणी साक्ष देणार असेल तर त्याबाबतह प्रतिज्ञापत्रात उल्लेख करावा.तुमच्या विरोधात एखाद्या महिलेने पोलिसात खोटी FIR नोंदवली असेल ता तुम्ही त्याला आव्हान देऊ शकतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment