- युटिलिटी डेस्क - एका व्यक्तीने RTI मध्ये बँकांशी निघडीत प्रश्नांची उत्तरे RBI कडे मागीतली होती. त्या प्रश्नांची जी उत्तरे RBI मार्फत मिळालेली आहेत ती प्रत्येक ग्राहकांसाठी उपयुक्त आहे. हा प्रश्न उत्तराखंड हल्दवानीचे उद्योजक प्रमोद गोल्डी ने RBI ला केला होता.RBI ने त्या प्रश्नांना अनुसरून काय उत्तरे दिली आहे हे आम्ही आपल्याला सांगतो.
जेवणाची वेळ सांगून कामे बंद करतात व टाळाटाळ करतात.- सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत विना थांबता सेवा देणे बँकांकडून अपेक्षित आहे. अधिकारी बदलून त्या जागी दुसरा अधिकरी नेमून जेवनासाठी जावू शकतात. पैश्यांची देवाण घेवाण त्यावेळी चालू असावी.- आपण पाहतो बऱ्याचदा बँकांमध्ये lunch break नावाचे फलक लावले जाते. त्या वेळेत ग्राहक lunch break होयीपर्यंत बराच वेळ ताठकळत असतात. जे की, नियमबाहय आहे.- जेवणाची वेळ सांगून gate बंद नाही करू शकत बँकेचे कर्मचारी.ग्राहकांना ताठकळत देखील नाही ठेऊ शकत.- काउंटरवर ग्राहकांच्या सेवेसाठी नेहमी कोणीतरी असावे.- ११११ किंवा २२२२ अश्या स्वरूपातील रक्कम बँक ठेवीमध्ये जमा करण्यास कोणतीही बँक नकार नाही देवू शकत. ठेवी स्वीकारण्या संबंधित अश्या कुठल्याही मार्गदर्शक बाबी नाहीत.ग्राहकांना बँकांमध्ये हे अधिकार का मिळतात?
- चेक स्वीकारण्यास कुठल्याही प्रकारचा विलंब झाल्यास ग्राहकांना बँकेकडून भरपाई मिळण्याचा अधिकार आहे.- ग्राहकाच्या खात्यातून अनधिकृत व्यवहारांसाठी बँक ग्राहकांना जबाबदार नाही ठरवू शकत.- कायमस्वरूपी पत्ता असल्याशिवाय खाते उघडता येणार नाही असे कोणतीही बँक सांगू शकत नाही.- ग्राहकांची वैयक्तिक माहिती गुप्त ठेवने ही बँकेची जबाबदारी आहे. बँकेला इतर कोणत्याही व्यक्तीला त्यासंदर्भात माहिती देता येत नाही.या प्रकरणात तर आपल्याला बँकेकडून मोबदला मिळण्याचा अधिकार आहे,केवळ नियम माहिती असावा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment