राजकोट - विंडिज विरोधातील पहिली कसोटी भारतीय फलंदाजांसाठी धावांजा खजिना घेऊन आलेली ठरली. पृथ्वी शॉने पहिल्या दिवशी धावांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. कोहलीने ते पुढे नेले आणि जडेजाने भारतीय डावाची यशस्वी सांगता केली. पण जडेजाने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती वाखाणण्याजोगी होती. नाबाद 100 धावा करत त्यांने कसोटी कारकिर्दीतील पहिले वहिले शतक झळकावले. विशेष म्हणजे त्याने याचे सेलिब्रेशनही खास त्याच्या स्टाइलमध्ये म्हणजे तलवारबाजी करत केले.
पाहा जडेजाची तलवारबाजी...
कोहली बोलावत राहिला, जडेजाचे सेलिब्रेशन सुरुच
कोहलीचे शतक होताच कोहलीने डाव जाहीर केला. पण त्याआधी शतक झाल्यानंतर जडेजाचे त्याच्या स्टाइलमध्ये सेलिब्रेशन सुरू झाले. सेलिब्रेशनच्या आनंदात कोहलीने परत बोलावले आहे, याकडे त्याचे लक्षच गेले नाही. कोहलीने दोन ते तीन वेळा त्याला हात दाखवला पण जडेजाचे सेलिब्रेशन सुरुच होते.
Post a Comment