0
  • मुंबई - तनुश्री दत्ता हिने लावलेल्या छेडछाडीच्या आरोपानंतर नाना पाटेकरने प्रथमच याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. नाना पाटेकर म्हणाले की, याबाबत मी आधीच सर्वकाही सांगितले आहे, आता जे खोटं आहे, ते खोटंच राहणार अशा शब्दांत नानांची या बाबत त्यांची प्रतिक्रिया दिली.

    पाहा, नेमके काय म्हणाले नाना..
    नाना पाटेकर एका कार्यक्रमाला आले असता, त्यांना पत्रकारांनी घेरले आणि त्यांना याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना नानांनी अशी प्रतिक्रिया दिली.

    अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने हॉर्न ओके प्लीज चित्रपटादरम्यान नानाने तिच्याबरोबर गैरवर्तन आणि छेडछाड केल्याचा आरोप केला होता. नानांनी या आरोपांनंतर तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचेही स्पष्ट केले होते. पण त्यानंतर पुढे काहीही आले नाही. आता हे प्रकरण नेमके किती पुढे जाते, हे लवकरच समजेल.

Post a comment

 
Top