0
 • भोपाळ - मध्य प्रदेशच्या थांदला येथील रेल्वे फाटकाजवळ भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एक ट्रक फाटक तोडून थेट धावत्या त्रिवेंदम राजधानी एक्सप्रेसला जाऊन भिडले. ही धडक इतकी जबरदस्त होती की क्षणार्धात ट्रकच्या चिंधड्या उडाल्या. सोबतच, एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास थांदला रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या फाटक क्रमांक 61 येथे घडली. रेल्वे क्रॉसिंगच्या वेळी एक भरधाव ट्रक रेल्वे क्रमांक 12431 (त्रिवेंद्रम–निझामुद्दीन) राजधानी एक्सप्रेसला धडकले.

  ट्रकच्या चिंधड्या, चालक जागीच ठार
  या दुर्घटनेत कोच बी8 आणि बी7 रुळावरून घसरले. धडक झाली तेव्हा रेल्वेचे इंजिन समोर निघाले होते. ट्रक थेट इंजिनला धडकले असते मोठी दुर्घटना घडली असती. तरीही या अपघातात ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला. आतापर्यंत कुठल्याही प्रवाशाचे जखमी होण्याचे वृत्त नाही. रुळावरून घसरलेल्या डब्यातील प्रवाशांना दुसऱ्या डब्यात शिफ्ट करून ट्रेन पुन्हा आपल्या दिशेने रवाना करण्यात आली. रेलवेने रतलाम झोन हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. कुणाला मदत हवी असल्यास किंवा माहिती हवी असल्यास 01472-230126, 232230, 232382 वर संपर्क साधता येईल
  .

  ही घटना गुरुवारी सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास थांदला रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या फाटक क्रमांक 61 येथे घडली.

  • truck rams into trivandrum rajdhani express madhya pradesh while railway crossing

Post a Comment

 
Top