0

पीडिता म्हणाली- त्याने मला वरच्या रिकाम्या वर्गात बोलावले, मग केले दार बंद.                               नागौर (राजस्थान) - शहराच्या बीआर मिर्धा कॉलेजमधून सोमवारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे याच कॉलेजच्या एका विद्यार्थिनीवर कॉलेज परिसरातच रेपची घटना पोलिसांत नोंदवण्यात आली आहे. एका विद्यार्थिनीवर तरुणाने कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी असताना रेप केला आहे.


शुद्ध आल्यावर तिने सर्व घटना आपल्या आईला सांगितली....
शहरापासून जवळच्याच एका गावातील 19 वर्षीय विद्यार्थिनी घटनेनंतर घाबरून घरी पोहोचली आणि बेशुद्ध झाली. या घटनेपासून अनभिज्ञ असलेल्या कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे दोन दिवस रक्त कमी असल्याने बेशुद्ध तरुणीवर उपचार सुरू होते. तिला रक्तही चढवण्यात आले. सोमवारी जेव्हा तरुणीला शुद्ध आली तेव्हा तिने सर्व घटना आपल्या आईला सांगितली. तरुणीने खुशवेंद्रचे नाव घेतले आणि सांगितले की, त्याने कसा पाशवीपणा केला. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. महिला पोलिस स्टेशन प्रभारी नंदकिशोर वर्मा यांनी जबाब नोंदवून कॉलेजमधील ती क्लासरूम सील केली. आरोपी सध्या फरार आहे.

ते 3 पाशवी कृत्य जे आरोपीने केले
- आरोपी खुशवेंद्र तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तिची प्रकृती बिघडल्याचे पाहून घाबरला. सतत ब्लीडिंग होत असल्याचे पाहून तो पळून गेला. तरुणीही अजूनपर्यंत खूप घाबरलेली आहे.
- आरोपी खुशवेंद्रने रेपनंतर पीडितेला धमकी दिली की, कुणाला काही सांगितले तर परिणाम भोगावे लागतील. यामुळे घाबरलेली विद्यार्थिनी घरी गेली, परंतु तेथे बेशुद्ध झाली. आता घटनेच्या दोन दिवसांनी ती बोलत आहे.
- कॉलेजमध्ये झालेल्या घटनेची माहिती पीडितेने आपल्या आईला सांगितली. कॉलेजमध्ये आपली मुलगी शिकतेय म्हणून कुटुंबाला खूप अभिमान वाटायचा, परंतु आता या घटनेनंतर हॉस्पिटलबाहेर एका झाडाखाली सर्व सुन्न होऊन बसून राहिले.
3 चुका, ज्या अनेक प्रश्न उपस्थित करतात...
- कॉलेज सुरू होते, तरीही अत्याचार- कॉलेज परिसरता जेव्हा ही घटना झाली तेव्हा इतर वर्ग सुरू होते. जेथे घटना झाली तो वर्ग पहिल्या मजल्यावर आहे. परंतु कुणालाही थोडीसुद्धा माहिती कळली कशी नाही?
- अजून सीसीटीव्ही फुटेज तपासले नाही- पोलिसांनी अजूनपर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासलेले नाही. सीआय नंदकिशोर वर्मा म्हणाले, कॉलेजला फुटेज सेव्ह करून ठेवण्याचे सांगण्यात आले आहे.
- सरकारी कॉलेजमध्ये निगराणी नाही- या कॉलेज परिसरात एक तरुण आला आणि विद्यार्थिनीला कॉलेज बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोरवर घेऊन गेला, परंतु कुणालाही साधा संशयसुद्धा आला नाही. यामुळे कॉलेज प्रशासनाची निगरानी आणि सुरक्षा व्यवस्थेचीही पोलखोल होते. शिवाय अनेक प्रश्न उभे राहतात.
उपचार सुरू
रेप पीडितेवर उपचार करत असलेले डॉक्टर म्हणाले की, तरुणी शनिवारी संध्याकाळी साडे 4 वाजता त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आली होती. ती बेशुद्धावस्थेत होती. ती बोलण्यातही सक्षम नव्हती. रक्त जास्त वाहिल्याने तिचा रक्तदाबही कमी आढळला. हिमोग्लोबिनही 7.2 होते. तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या ती हिंडता-फिरता येते 
Girl Molestation In College Classroom In Rajshthan latest News And Updates

Post a Comment

 
Top