पाटणा - येथे राहणारे 65 वर्षीय रोशन लाल यांनी मुलाच्या लग्न मंडपात आपल्याच होणाऱ्या सुनेसोबत स्वतः विवाह केला आहे. विशेष म्हणजे, या लग्नासाठी त्या मुलीचे कुटुंबीय सुद्धा स्वखुशीने आणि स्वतःच्या मर्जीने तयार झाले. लग्नासाठी कुणीही आक्षेप घेतला नाही. त्यांनी ज्या मुलीसोबत विवाह केला तिचे वय फक्त 21 वर्षे आहे. या विवाहातून ती सुद्धा खुश आहे. या विवाहाची माहिती जेव्हा समोर आली तेव्हा सगळेच हैराण आहेत. तब्बल 65 वर्षांच्या व्यक्ती आपल्याच मुलाच्या होणाऱ्या पत्नीसोबत विवाह कसा केला असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यानंतर खुद्द रोशन लाल यांनी लग्नाच्या दिवशी नेमके काय घडले याचा खुलासा केला.
मुलाच्या लग्नाच्या दिवशी घडले असे काही...> पाटणा शहरात राहणारे रोशन लाल यांनी आपल्या मुलाचा विवाह शहरातच राहणाऱ्या 21 वर्षीय सपनासोबत निश्चित केला होता. जुलै महिन्यात झालेल्या या विवाहासाठी त्यांचा मुलगा तयार होता. तो आपल्या वडिलांसह वरात घेऊन मंडपातही पोहोचला. परंतु, लग्नाचा विधी सुरू होणार तेवढ्यात मुलगा गायब झाला.
> मुलगा बेपत्ता झाल्याने घामाघूम झालेले रोशन लाल यांनी फोन लावले, त्याच्या मित्रांच्या मदतीने शोधही सुरू केला. अचानक मंडपात निर्माण झालेल्या गोंधळाने सपनाचे आई-वडील प्रचंड घाबरले. नवरदेव भर मंडपातून गेला तरी कुठे असा प्रश्न सर्वांना पडला होता. यानंतर त्या मुलाचे दुसऱ्या तरुणीवर प्रेम होते आणि वडिलांच्या दबावातून तो लग्नासाठी तयार झाला होता अशी माहिती समोर आली. वडिलांच्या भीतीने तो वरात घेऊन आला. परंतु, मंडपातून ऐनवेळी पळून गेला.
> पालकांच्या दबावात येऊन मुले किंवा मुली विवाह करतात. परंतु, अशा विवाहाने ते स्वतःच्या आयुष्यासह पार्टनर आणि समस्त कुटुंबियांचे जीवन उद्ध्वस्त करतात. अनेकवेळा अशा प्रकारे केले जाणारे विवाह टिकत सुद्धा नाहीत. तरीही आई-वडील बळजबरी आपल्या मुलांचे विवाह लावून देतात तेव्हा काय घडू शकते याचे हे जिवंत उदाहरण आहे.
सासराच बनला नवरदेव
सपनाच्या आई वडिलांना ही गोष्ट कळाल्यानंतर त्यांनी आपला संपूर्ण राग रोशन लाल यांच्यावर काढला. रोशन यांना आपल्या मुलाच्या अफेअरची पूर्वकल्पना होती. तरीही त्यांनी सपनासोबत विवाहासाठी मजबूर केले होते. ऐनवेळी नवरदेव पळून गेल्याने समाजात आपली बदनामी होईल आणि या मुलीसोबत कुणीही लग्न करणार नाही असे सपनाच्या पालकांनी सुनावले. सोबतच, संपूर्ण दोष रोशनलाल यांचा असल्याने त्यांनीच या लग्नाची जबाबदारी घ्यावी असे ठणकावले. त्यानंतर विधुर असलेल्या रोशन लालने स्वतः सपनासोबत लग्नाची तयारी दर्शवली. यावर सपना आणि तिचे आई-वडील वेळीच तयार झाले. त्याच लग्नाच्या मांडवात रोशनलाल आणि सपनाचा विवाह लावण्यात आला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment